रशियाच्या खासगी लष्कर वॅगनर प्रमुखांचा विमान अपघातात मृत्यू | पुढारी

रशियाच्या खासगी लष्कर वॅगनर प्रमुखांचा विमान अपघातात मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : मॉस्कोच्या उत्तर-पश्चिम भागात झालेल्या विमान अपघातात वॅग्नरच्या लष्काराचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांचा मृत्यू झाला आहे. या विमानात सात प्रवाशांसह तीन क्रू मेंबर होते आणि सर्वांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले असून त्यांची ओळख पटली आहे. रशियाच्या विमान वाहतूक संस्थेने सात प्रवाशांची ओळख पटवून त्यांची नावे दिली आहेत. प्रीगोझिन यांना घेऊन जाणारे हे विमान बुधवारी (दि. २३) कोसळले होते.

प्रिगोझिनसह, त्याचे जवळचे सहकारी दिमित्री उत्किन, सर्गेई प्रोपस्टिन, येवगेनी मकारियन, अलेक्झांडर टॉटमिन, व्हॅलेरी चेकालोफ आणि निकोलाई मातुसेयेव यांचाही अपघातात मृत्यू झाला. कॅप्टन अॅलेक्सी लेव्हशिन, सहवैमानिक रुस्तम करीमोव्ह आणि फ्लाइट अटेंडंट क्रिस्टिना रास्पोपोवा अशी क्रू मेंबर्सची नावे आहेत. या वर्षी जूनमध्ये, प्रीगोझिनच्या नेतृत्वाखाली वॅगनरच्या सैन्याने रशियामध्ये बंड करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.

प्रीगोझिन यांच्यावर हल्ला, दरोडा, फसवणुकीचा गुन्हा

येवगेनी प्रिगोझिन यांचा जन्म 1 जून 1961 रोजी सेंट पीटर्सबर्ग येथे झाला. पुतीनप्रमाणेच येवगेनी सेंट पीटर्सबर्गमध्ये वाढले. रशियन न्यायालयाच्या कागदपत्रांनुसार, येवगेनी यांना 1981 मध्ये प्राणघातक हल्ला, दरोडा आणि फसवणूक केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना 13 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

हेही वाचा : 

Back to top button