गोंधळ झाल्यास कार्यक्रम करणार नाही : गौतमी पाटील | पुढारी

गोंधळ झाल्यास कार्यक्रम करणार नाही : गौतमी पाटील

नगर : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या नागापूर परिसरात कार्यक्रमात मंगळवारी (दि. 1) काही जणांनी दगडफेक केली. त्यात एक महिला जखमी झाल्याचे समजते. एका जणाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित गौतमी पाटीलच्या नृत्याच्या कार्यक्रमाला सायंकाळी साडेसात वाजता सुरुवात झाली होती. कार्यक्रम सुरू असताना काही जणांनी स्टेजवर दगड फेकले. त्यात एक महिला किरकोळ जखमी झाल्याचे समजते. माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप कार्यक्रमस्थळी दाखल झाले. दरम्यान, गोंधळामुळे गौतमी पाटीलने कार्यक्रम अर्ध्यावरच बंद केला. यापुढे गोंधळ झाल्यास ‘मी कार्यक्रम घेणार नाही’, अशी भूमिका गौतमीने जाहीर केली.

हेही वाचा : 

चायनीज मांजा वापरल्यास पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा

धक्कादायक ! शाळेच्या भिंतीसह छत कोसळले

Back to top button