उंबरेतील प्रकरणामागे दडलेय मोठे षड्यंत्र!

उंबरेतील प्रकरणामागे दडलेय मोठे षड्यंत्र!
Published on
Updated on

लक्ष्मण पटारे

उंबरे(अहमदनगर) : संपूर्ण राज्याला हादरवून सोडणार्‍या उंबरे येथील लव- जिहाद व धर्मांतराचे पडसाद उमटत असतानाच दररोज अनेक नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. लव- जिहाद व धर्मांतर करण्यासाठी उच्चभ्रू शिक्षिकांसह महिलांचा वापर कसा केला जातो. ज्ञानदान करणार्‍या शिक्षकाला देवाचा दर्जा माणून पुजले जाते. शिक्षक – विद्यार्थ्यांचे नाते आई- वडील व मुलाप्रमाणे असते. यामुळे पालक वर्ग कुठला जात, धर्म न बघता मुले शिक्षकांकडे पाठवतात, परंतु एका शिकवणीच्या शिक्षिकेचा प्रताप उंबरे येथे उघड झाल्याने यामागे मोठे षडयंत्र असल्याचे बोलले जात आहे.

उंबरे येथील खासगी क्लास घेणार्‍या हिना या शिक्षिकेकडे अनेक मुली शिक्षण घेत होत्या. कमी फीमध्ये शिक्षण देऊन ही शिक्षिका अनेक मुलींना आपल्या जाळ्यात ओढण्याच्या कामात यशस्वी झाली होती. खासगी क्लास बरोबरचं ती इतर ठिकाणी खासगी शाळेमध्ये नोकरी करीत होती. यामुळे गावामधील मुलींसह या शिक्षिकेचे बाहेर गावातील मुलींशी संबंध आले होते. ती शिक्षिका असल्यामुळे तिच्याकडे अनेक मुली शिक्षणासह इतर विषयावर चर्चा करत होत्या. त्यामध्ये क्लासला न येणार्‍या काही मुली होत्या.

शिक्षिकेकडे क्लासमध्ये शिक्षणास 12- 13 मुली होत्या, परंतु बाहेरगावातील अनेक मुलींशी तिची जवळचे संबंध होते. त्यामुळे हे प्रकरण येथेच थांबले नसून, यामध्ये आणखी मुली गुंतल्या असून, ही व्याप्ती मोठी आहे. त्याची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे जागरुक नागरीक बोलत आहेत. या शिक्षिकेला बिहार, उत्तर प्रदेश येथून आलेले काही मौलानांसह अन्य मंडळी मार्गदर्शन करीत असल्याची चर्चा सुरु आहे.

लव- जिहाद व धर्मांतर करण्यास आर्थिक मदतीबरोबरच कट्टर धार्मिक शिक्षण देत, अल्पवयीन असलेल्या मुलींना जाळ्यात ओढून त्यांच्याशी मैत्री करून त्यांचे माईंड वॉश करण्याचे काम सुरू होते. दंडावर ताईत बांधला जातो. त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. ताईत त्या शिक्षिकेला कोण पुरवत होते, त्या ताईतमध्ये काय आहे, याची चौकशी होणे गरजेचे आहे.

खाण्यात कोणता तरी पदार्थ टाकून त्या मुलींचे मेंदू हॅमरिंग करण्याचे काम केले जाते. त्यामुळे त्या पदार्थामध्ये असा कोणता पदार्थ असतो की, त्या मुलींच्या मनावर परिणाम होतो. याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. तो पदार्थ खाल्ल्यामुळे मुली कायम डिप्रेशनमध्ये राहतात. मग त्यांचे अन्य धर्मिय मुलाबरोबर संबंध जुळवून दिले जातात त्या मुलींबरोबर सेल्फी व इतर प्रकारचे फोटो काढले जातात.

त्या मुलीचा नंबर घेऊन त्यावर रात्रभर चॅटिंग केली जाते. एखाद्या मुलीने आरोप केला तर फोटो सोशल मीडियावर टाकण्याचा दाब देऊन धमकावण्यात येते. यामुळे भेदरलेल्या अशा मुली घरच्यांना काही सांगत नाहीत. त्यामुळे त्या घरच्यांशी मनमोकळ्या गप्पा मारीत नाहीत. मनातलेही काही सांगत नाहीत. त्याचाच फायदा घेऊन लव- जिहाद करून मुलींना पळून नेले जाते. या कामासाठी अशा काही लोकांना आर्थिक फंड मोठ्या प्रमाणात मिळतो.

उंबरे येथील घडलेल्या घटनेतून मोठे रॅकेट समोर येणार आहे. दररोज एक नवीन खुलासा होत आहे. याची व्याप्ती उंबरे गावापुरती मर्यादित राहिली नसून, ती संपूर्ण जिल्हा अन् राज्यभर व्यापली आहे. यामध्ये शिक्षिकेसह लहान- मोठे व्यवसाय करणारे तसेच संस्था ऑफिसमध्ये काम करणार्‍यांचा इतर काहींचा सहभाग आहे.

उंबरेतील त्या शिक्षिकेचे बाहेरील मुलींसोबत संबंध असल्याने त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. मुलींचा नाजूक विषय असल्याने बरेच पालक तक्रार देण्यास तयार नसतात. त्याचाच फायदा असे लोक घेतात. यामुळे प्रत्येक गावातील पालकांनी आपल्या मुलीवर अन्याय झालेला असल्यास पोलिस स्टेशनमध्ये तक्रार द्यावी. तरचं कुठेतरी अशा भयानक गोष्टीला आळा बसेल, अन्यथा, त्यांचे चाळे असेच फोफवतील, अशी संतप्त चर्चा उंबरे परिसरात सुरु आहे.

उंबरेगावात शांतता पूर्ववत होत आहे. काही समाजकंटक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यावर पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई तर झालीच पाहिजे, परंतु निर्दोषाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, अशी अपेक्षा उंबरे ग्रामस्थ करीत आहेत.

पडद्याआडचे आणखी आरोपी शोधावेत..!

उंबरे येथील घटनेला चार-पाच दिवस उलटले. आरोपींना अटक केली, परंतु पडद्याआड असलेले आणखी काही आरोपी अद्याप हाती लागले नाहीत. पोलिस प्रशासनाने या प्रकरणांमध्ये सखोल चौकशी करून शेवटच्या आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा. तरचं लव- जिहाद व धर्मांतराचा खेळ संपेल, असे बोलले जात आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news