पुढारी ऑनलाईन डेस्क : कोविड-19 महामारीच्या जेव्हा कोणाला आशा नव्हत्या तेव्हा अभिनेता सोनू सूद – एक अभिनेता, एक मानवतावादी आणि सामान्य माणसाचा खरा 'मसिहा' ठरला. आणि खऱ्या अर्थाने एक प्रकाशाचा किरण उदयास आला. संकटकाळात लोकांना मदत करण्याच्या त्यांच्या निस्वार्थ प्रयत्नांनी लाखो लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले. एवढं असून ही सोनू नेहमीच नम्र राहतो आणि सतत समाजाची सेवा करतो.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, 'मसीहा' ही पदवी बहाल केल्याबद्दल विचारले असता, सोनू सूदने नम्रपणे उत्तर दिले, "मी एक पुस्तकही लिहिले होते – आय अॅम नो मसिहा – कारण ते थोडेसे लाजिरवाणे वाटते. मला असे वाटते की सामान्य माणसाशी जोडले जाणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. मी लोकांना सांगतो की मी त्यांच्यापैकी फक्त एक आहे आणि मला आयुष्यभर तसच राहायचे आहे."
"संपूर्ण जग 'आशा' आणि 'प्रयत्नांवर' अवलंबून आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला आशा असते की तुम्ही त्यांचे जीवन बदलू शकाल आणि तुम्ही तसे करण्याचा प्रयत्न करता आणि प्रत्यक्षात तसे करता तेव्हा मला वाटते की ही सर्वात समाधानकारक भावना आहे, असं सोनूने व्यक्त केले. जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकण्याचे सोनू सूद हा गेम चेंजर बनला आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी जग बदलण्याचा प्रयत्न करत राहीन अस सोनू सांगतोय.
सोनू सूदचा प्रभाव मानवतावादी प्रयत्नांच्या पलीकडे पसरलेला आहे आणि अलीकडे तो MTV रोडीज 19 चे होस्ट म्हणून आपल्या करिष्माई उपस्थितीने प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. चाहते त्याच्या आगामी अॅक्शन-पॅक्ड चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहेत. फतेह हा प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे अस समजतंय.