करंजी : खांडगावजळ एअरव्हॉल्वला मोठी गळती | पुढारी

करंजी : खांडगावजळ एअरव्हॉल्वला मोठी गळती

करंजी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी पाथर्डी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे बहुतांश गावांमध्ये पिण्याची पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मिरी-तिसगाव प्रादेशिक नळयोजनेचे पाणी सुमारे 32 गावांना दिले जात आहे. याच नळयोजनेच्या मुख्य पाईपलाईनसाठी बसविण्यात आलेला एअरवॉल्वला खांडगावजवळ मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. या एअरवॉल्वमधून वाहणारे पाणी शेतीसाठी जाते.

सध्या सर्वत्रच पिण्याची पाणीतीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्याचबरोबर पावसाने ओढ दिल्याने शेतीसाठी पाण्याची मोठी गरज आहे. अशा परिस्थितीत खांडगावजवळ मुख्य पाईपलाईनच्या एअरवॉल्वला मोठी गळती लागून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. खांडगाव बरोबरच तिसगावलाईनच्या मुख्यलाईनवर बसवलेले काही एअरवॉल्व नादुरुस्त होऊन त्यामधून पाणी गळती होत आहे. त्याकडे प्रादेशिक नळयोजनेच्या कर्मचार्‍यांचे डोळेझाक होत असताना दिसत आहे. किमान पाणीटंचाईच्या काळात सर्वांना नियमित व मुबलक पाणी मिळावे,एवढीच लाभधारक गावांची मापक अपेक्षा आहे.

हेही वाचा

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली तरुणास साडेआठ लाखांचा गंडा

Morari Bapu : प्रसिद्ध कथाकार मोरारी बापू यांनी घेतले वैद्यनाथाचे दर्शन

माळीणची 9 वर्षं : आजही अंगावर येतात काटे..! गाळातून जावे लागते शेतीत

Back to top button