संगमनेरात मोहरम मिरवणुकीला गालबोट | पुढारी

संगमनेरात मोहरम मिरवणुकीला गालबोट

संगमनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : मोहरमच्या निमित्ताने निघालेल्या मिरवणुकीत जोर्वे नाका येथील एकाने सवारी घेऊन जाणार्‍यांना धक्काबुक्की केल्याने त्याची विचारणा करण्यास गेलेल्या अश्पाक अल्ताफ शेख याच्या डोक्यामध्ये लोखंडी फाईटने मारल्याने डोक्याला जबर मार लागला. त्यात तो जखमी झाला. त्यामुळे मोहरम मिरवणुकीला संगमनेरात गाल बोट लागले.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास सालाबादप्रमाणे जेधे कॉलननीतील समीर राजू शेख यांच्या अंगात सवारी येत असल्याने त्याच कॉलनीत राहणारा अश्पाक अल्ताफ शेख व जमीर राजू शेख हे दोघे समीर शेख यांच्यासह सवारी घेवून जेधे कॉलनी, मेनरोड, सय्यद बाबा चौक मार्गाने गेले. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास समीर शेख हा सवारी शिकलकर गल्लीतून मोगलपूरा मशिदीकडे जात असतांना जोर्वे नाक्यावरील तलहा शेख याने समीर शेख यांना धक्का दिला.

त्यावरुन अश्पाक व जमीर शेख यांनी त्याच्याकडे विचारणा केली असता, त्याचा राग येवून तलहा शेख याने त्याच्या हातात असलेल्या लोखंडी फाईटने अश्पाक याच्या डोक्यात मारले. त्यामुळे त्याच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात गंभीर दुखापत होवून तो जखमी झाला.
याबाबत अशपाक शेख यांनी संगमनेर शहर पोलीसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तलहा करीम शेख रा .जोर्वे नाका तालुका -संगमनेर याच्या विरोधात घातक शस्त्रांचा वापर करुन मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या बाबतचा पूढील अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.

हेही वाचा

क्रीडा : किमयागार युवा टेनिसपटू

कोल्हार : भगवंताने आपले म्हणावे अशी भक्ती करावी

अहमदनगर : चापेवाडी-शेटेवस्ती रस्त्याची दुरवस्था

Back to top button