कोपरगाव : संवत्सरच्या पौराणिक शृंगेश्वर मंदिरात गर्दी! | पुढारी

कोपरगाव : संवत्सरच्या पौराणिक शृंगेश्वर मंदिरात गर्दी!

महेश जोशी

कोपरगाव(अहमदनगर) : दक्षिणकाशी गंगा गोदावरी नदीचा पवीत्र काठ कोपरगाव शहरासह तालुक्याला लाभला आहे. श्रीक्षेत्र संवत्सर येथे विभांडक ऋषींचे चिरंजीव शृंगऋषी यांचे पुरातन मंदिर आहे. श्रावणात येथे भाविकांची मोठी गर्दी असते. नागपूर- मुंबई समृध्दी महामार्गामुळे संवत्सर- कोकमठाण गावचे ऐतिहासिक व पौराणिक पुरातन महत्व वाढले आहे. भारताचा पवित्र ग्रंथ श्रीराम-विजय कथासारमध्ये पान क्रमांक 38 ते 41 वर तसेच कथा कल्पतरू ग्रंथात विभांडक ऋषी व त्यांचे सुपुत्र शृंगेश्वर यांचा पौराणिक संदर्भ प्रकाशित झालेला आढळतो.

नारद मुनींना भगवान श्रीकृष्णाच्या 16 हजार सहस्त्र नारी पाहुन मनात इच्छा प्राप्त झाली की, आपणही स्त्री व्हावं. भगवान श्रीकृष्णाने तथास्तु म्हटलं आणि नारदाने नदीत स्नान केल तेथेच ‘नारदाचं’ रूप ‘नारदी’ स्त्रीमध्ये झाले. कालौघात त्यांना 59 मुले व 1 मुलगी कपिला झाली. पुढे युध्दात नारदाची 59 मुले मारली गेली, अशी अख्यायिशका आहे. ही कथा द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण व नारदमुनी यांची आहे.

कश्यप ऋषींचा मुलगा विभांडक आणि त्यांचा मुलगा शृंगेश्वर तप करता -करता त्यांच्या डोक्याला शिंग फुटले होते म्हणून त्यांचे नाव शृंगऋषी पडले. या शृंगेश्वर मंदिरामागे गोदावरी नदी काठी नारदाच्या मुलांच्या 59 समाध्या आजही साक्ष देतात. एकदा या शृंगेश्वर मंदिरावर इंद्राची सभा सुरू होती. या सभेस ऋषी-मुनीही उपस्थित होते. राजा इंद्राने वरूणराजाला विनंती केली, ‘पाऊस थांबवा. त्यावर ऋषीमुनींनी या घटनेला उशाप विचारला. तेव्हा शृंगेश्वर आश्रमात ऋषी भोजन घातल्यावर येथे पाऊस पडेल, असा उशाप दिला. तेव्हापासून आजतागायत ही परंपरा संवत्सर येथे सुरू आहे, अशी अख्यायिका आहे.

रोमचरण राजाच्या राज्यात 12 वर्षे दुष्काळ पडला होता, तेव्हा राजाने हे संकट कसे दुर होईल, असे विचारले असता शृंगऋषींना आणल्यावर ते दुर होईल, सांगण्यात आले होते. संवत्सर हा परिसर पुर्वी दंडकारण्यमय होता. प्रभु श्रीरामचंद्रांनी त्यांच्या 14 वर्षे वनवासाचा काही काळ येथे व्यतित केला. अयोध्येचे रघुवंश कुळातील राजा दशरथ यांना पुत्रप्राप्तीसाठी शृंगऋषींच्या हस्ते पुत्रकामेष्टी यज्ञ झाल्यावर पुत्र प्राप्त होईल, अशी भविष्यवाणी झाली होती. म्हणून राजा दशरथांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता.

यज्ञ पाहण्यास अनेक राजांसह वामदेव, जबाली, शातातप, संजय, वसिष्ठ, कश्यप, कौंडीण्य, कण्व, गौरमुख, पाराशर, बकदाल्भ्य, शतानंद, सुमंतु, सौभरी, वेदविद, गार्ग्य, मार्कडेय, नारद व कौशिक हे ऋषी उपस्थित होते. हे सगळे संदर्भ तत्कालीन संपादक दामोदर सावळरामा यंदे प्रताप प्रकाशन (गिरगाव, मुंबई) यांच्या कथा कल्पतरू ग्रंथ स्तबक 3 मध्ये अधोरेखीत आहेत. या ग्रंथातून आपल्याला इतिहासाची ओळख होते.

कोपरगावपासुन 10 कि. मी. अंतरावर संवत्सर गाव आहे. येथून नागपूर- मुंबई द्रुतगती महामार्ग गेल्याने रस्त्यावरील भाविकही मोठ्या प्रमाणात शुंगेश्वर आश्रमात महादेवाच्या दर्शनास येतात. या मंदिराचा ब्रम्हलिन संत रामदासीबाबा, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी व आत्मा मालिक (जंगलीदास माऊली) यांच्या हस्ते 1989 मध्ये जीर्णोध्दार झाला. गोदावरी नदीकाठी हे स्थान नयनरम्य स्थान आहे. श्रावणात येथे भाविकांची दर्शन व अभिषेकास मोठी गर्दी होते. अध्यात्मीक संत मीराबाई मिरीकर यांना शृंगेश्वर ऋषींच्या आश्रमातच साक्षात्कार झाला.

हेहा वाचा

अहमदनगर तालुक्यात 85 टक्के पेरण्या

संगमनेर : महाविद्यालयीन तरुणीचे अपहरण करून अत्याचार

अहमदनगर : मुळा धरणामध्ये 57 टक्के पाणीसाठ्याची नोंद

Back to top button