संगमनेर : महाविद्यालयीन तरुणीचे अपहरण करून अत्याचार | पुढारी

संगमनेर : महाविद्यालयीन तरुणीचे अपहरण करून अत्याचार

संगमनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : मामाच्या गावी आलेल्या 19 वर्षीय महाविद्यालयात शिकणार्‍या तरुणीला केशव बबन काळे या तरुणाने बळजबरीने पळवून नेवून तिच्यावर त्याने दोन दिवस अत्याचार केला. या घटनेनंतर तिसर्‍या दिवशी त्याने तिला आळंदी येथे नेवून लग्न केले, मात्र लग्न करून घरी आल्यानंतर काळे याचे पहिले लग्न झाल्याचे ऐकून तिला धक्काच बसला. तिने घारगाव पोलिस ठाणे गाठत त्याच्याविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी त्याच्या विरोधात अपहरण, अत्याचार व धमकावल्याचा गुन्हा दाखल केला.

याबाबत घारगाव पोलिसांनी सांगितले की, पठार भागात 19 वर्षीय विद्यार्थीनी मामाकडे राहत होती. ‘इन्स्टाग्राम’ या समाजमाध्यमातील प्लॅटफॉर्मवर तिची केशव बबन काळे या तरुणाशी ओळख झाली. दोघांमध्ये चॅटींग व संभाषण सुरू झाले. मंगळवारी तिला फोन करुन तो म्हणाला, ‘तू , माझी झाली नाही तर मी तुला कोणाचीही होवू देणार नाही. मी बोलविल्यानंतर तू आली नाही तर तुझ्यासह भावाला ठार मारील,’ अशी धमकी दिली.

दरम्यान, ती महाविद्यालयात जाण्यास निघाली असता केशव काळे दुचाकीवरुन येत, ‘तू माझ्याबरोबर चल,’ असे म्हणत तिला गाडीवरुन जुन्नर तालुक्यातील काबाडवाडी येथे त्याच्या मामाच्या गावी घेवून गेला. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला, ‘तू माझ्याशी लग्न केले नाही तर मी जीव देईल,’ अशी धमकी दिली. यानंतर बळजबरीने त्याने तिच्याशी लग्न केले. लग्न झाल्यानंतर ते दोघे काळे याच्या कुरकुंडी गावी गेले. तेव्हा त्याचे लग्न झाल्याचे तिला समजले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने भावाशी संपर्क साधून ही माहिती दिली. कुटुंबिय तिला सोबत घेवून गावी आले. तिच्या फिर्यादीवरुन पो. उ. नि. उमेश पतंगे यांनी. केशव बबन काळे (वय 23, रा. कुरकुंडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

तरुण सराईत गुन्हेगार

अत्याचार प्रकरणातील केशव काळे हा सराईत गुन्हेगार आहे. तो दुचाकी चोरीप्रकरणी जुन्नर पोलिसांच्या ताब्यात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. त्याला घारगाव पोलिसांकडे वर्ग केले जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

हेही वाचा

सिंधुदुर्ग : शिवापूर येथील शेतकरी कर्ली नदीपात्रात गेला वाहून

अहमदनगर जिल्ह्यात 1850 प्रधानमंत्री किसान समृध्दी केंद्र होणार!

अहमदनगर तालुक्यात 85 टक्के पेरण्या

Back to top button