वाळकी : आ. रोहित पवारांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलने | पुढारी

वाळकी : आ. रोहित पवारांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलने

वाळकी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुंबई एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आमदार राम शिंदे यांचा एकेरी उल्लेख करत ‘बघून घेतो’ असा धमकीवजा इशारा दिला होता. याच्या निषेधार्थ भाजपचे नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देत दादागिरी व दडपशाहीची भाषा अशीच राहिल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भालसिंग यांनी दिला.

पवार कुटुंबियांच्या संस्काराला न पटणारे अन् दादागिरीची भाषा वापरणार्‍या आमदार पवारांच्या वक्तव्याचे पडसाद जिल्हाभरात उमटले आहेत. यावेळी गणेश भालसिंग, युवराज पोटे, बाळासाहेब पोटघन, राम भालसिंग, रमेश पिंपळे, दादासाहेब बोठे, प्रथमेश भालसिंग, बापू बेरड, कचरू सोनार, सचिन बोठे, विक्रम भालसिंग, राम कासार आदी उपस्थित होते.

हेही वाचा

सयाजी शिंदे-प्रवीण तरडेचा ‘आणीबाणी’ यादिवशी होणार प्रदर्शित

जेजुरी : नाझरे धरणात उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्के

कोल्हापूर : कुरुंदवाड येथील सातव्या दिवशीच्या पीर-पंजाच्या भेटी उत्साही वातावरणात संपन्न

Back to top button