कोल्हापूर : कुरुंदवाड येथील सातव्या दिवशीच्या पीर-पंजाच्या भेटी उत्साही वातावरणात संपन्न | पुढारी

कोल्हापूर : कुरुंदवाड येथील सातव्या दिवशीच्या पीर-पंजाच्या भेटी उत्साही वातावरणात संपन्न

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : येथील पीर पंजांच्या सातवी दिवशी पहिल्या पीरांच्या भेटी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्या. बागवान पीर मोमीन पीरसह ९ पीरांच्या भेटी उत्साही भक्तिमय वातावरणात रात्री उशिरापर्यंत संपन्न झाल्या. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सपोनि रविराज फडणीस यांनी चोख पोलिस बंदोबस्त लावला होता.

पाऊस असल्याने पीर भेटीसाठी निघणार की नाही? अशी संभ्रमावस्था निर्माण झाली होती. भर पावसातही पीर भेटी पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. बुधवारी रात्री मोहरमच्या सातव्या दिवशीच्या पहिल्या भेटीला सुरुवात झाली. गवान पीर, मीन पीर, कुडेखान पीर, कारखाना पीर, बट्टे पीर, एकता पीर, ढेपणपूर पीर, खाटीक पीर, शेळके पीरांची राजवाडा येथे बिबी फातिमा व बारा इमाम पीराच्या भेटी संपन्न झाल्या.

शहरातील सन्मित्र चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, नगरपालिका चौक, दर्गा चौक ते राजवाडा या प्रमुख मार्गावरून पीरांच्या मिरवणुका निघाल्या होत्या. भेटी शांततेत पार पाडणयासाठी मिरासो पाथरवट, शकील गरगरे, बापूसाहेब असंगे, तानाजी आलासे, इब्राहिम बारगीर, शब्बीर भिलवडे, प्रवीण खबाले आदींनी परिश्रम घेतले.

हेही वाचा : 

Back to top button