श्रीगोंदा : कार-टॅ्रक्टर अपघातात चालकाचा मृत्यू

श्रीगोंदा : कार-टॅ्रक्टर अपघातात चालकाचा मृत्यू

श्रीगोंदा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा ते काष्टी रस्त्यावर कार व ट्रॅक्टरच्या भीषण अपघातात कारचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला. रविवारी रात्री 1 वाजता सातव वस्तीवजवळ ही घटना घडली. विजय गोरख कुदळे (वय 35, रा मेहेत्रे मळा श्रीगोंदा) असे या अपघातात मृत्यू झालेल्या मृताचे नाव आहे. अपघातात विकास अर्जुन मेहेत्रे (रा श्रीगोंदा) हे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची फिर्याद मयताचा भाऊ रविराज गोरख कुदळे यांनी दिली. विजय कुदळे व विकास मेहेत्रे हे एम एच 12 बी व्ही 7358 क्रमांकाच्या कारमधून काष्टीला जात असताना ट्रॅक्टर व कार यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात विजय कुदळे यांचा जागीच मृत्यू झाला. विकास मेहेत्रे गंभीर जखमी झाले असून, त्यांना नगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृत विकास कुदळे यांच्या मागे आई, पत्नी व दोन लहान मुली आहेत.

अपघाताची पुनरावृत्ती

याच जागी गेल्या वर्षी मोटार अपघात झाला होता. त्यात शहरातील दोघे जागीच ठार झाले होते. त्या अपघाताची पुनरावृत्ती रविवारी पुन्हा झाली. त्यामुळे वाहन चालविताना काँक्रिटच्या रस्त्यावर खबरदारी घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news