पारनेर : भूमी अभिलेख कार्यालयात एजंटचा सुळसुळाट | पुढारी

पारनेर : भूमी अभिलेख कार्यालयात एजंटचा सुळसुळाट

पारनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : येथील भूमिअभिलेख कार्यालयामध्ये खासगी एजंट असून, कागदपत्रे जर गहाळ झाली, तर त्याला कोणाला जबाबदार धरणार, तसेच तालुक्यातील कोर्ट वाटप प्रकरणे प्रलंबित आहेत. ते लवकरात लवकर मार्गी लावावे या मागणीचे निवेदन ‘मनसे’तर्फे मुख्यालय सहायक भास्कर वाघमोडे व मिलिंद भिंगारदिवे यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले की, भूमिअभिलेख कार्यालयात एजंट असून, खासगी लोक काम करत आहेत. यामुळे कागदपत्रात अफरातफर, खाडाखोड झाल्यास खासगी लोकांना जबाबदार धरले जावे, अनेक दिवसांपासून कोर्टाचे प्रकरण अवलंबित आहेत. ते लवकरात लवकर निकाली काढण्यात यावे, कार्यालयातील छताचा स्लॅब खराब झाल्यामुळे ते काम सुरू आहे. सेवानिवृत्त कर्मचारी कार्यालयामध्ये कामे करतात, सेवानिवृत्तीनंतर त्यांचे कार्यालयात काय काम?, असे निवेदनात म्हंटले आहे. यावेळी ‘मनसे’चे कार्यकर्ते सतीश म्हस्के, दिलीप दिवटे, दर्शन गायकवाड, नितीन लंके, संतोष वाबळे आदी उपस्थित होते.

पारनेर भूमिअभिलेख कार्यालयात शेतकर्‍यांची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. येथे एजंटचा सुळसुळाट असून, रेकॉर्ड गायब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित जबाबदार अधिकार्‍यांनी याकडे तातडीने लक्ष द्यावे.

– सतीश म्हस्के,
मनसे नेते, पारनेर तालुका

हेही वाचा

हात-पायही हलवता येणार नाही, असे तिचे घर!

‘बिपरजॉय’ने स्वप्नावर फिरले पाणी; कोळगावातील शेतकरी चिंतातूर

मढी : फळबागा टाकू लागल्या माना ..! पाऊस लांबल्याने शेतकर्‍यांचा टँकरने पाणीपुरवठा

Back to top button