हात-पायही हलवता येणार नाही, असे तिचे घर! | पुढारी

हात-पायही हलवता येणार नाही, असे तिचे घर!

न्यू जर्सी : शक्य तितकी कमाई करावी आणि आपल्यासाठी आलिशान घराची खरेदी करावी, हे जवळपास प्रत्येकाचे स्वप्न असते, जेणेकरून आयुष्य छानछौकीत जगता येईल. कित्येकांना आपण छोट्या घरातून मोठ्या घरात शिफ्ट होताना पाहतो. पण ‘द सन’ने दिलेल्या एका वृत्तानुसार, कारी नामक एका महिलेने खर्च कमी करण्यासाठी आलिशान घर सोडून तंबूवजा अशा घरात राहण्याचा निर्णय घेतला, ज्यात हिंडण्या-फिरण्याची सोडा, अगदी हात-पाय हलवण्याइतकीही जागा नाहीय!

अमेरिकेतील न्यू जर्सी येेथे ही महिला पूर्वी राहात असे; पण नंतर तिने आपल्या आयुष्यात व्यापक फेरबदल करत स्वत:ला छोट्या घरात शिफ्ट केले. कारीचे पूर्वीचे घर 850 चौरस फुटांचे होते. पण त्याचे भाडे व मेंटेनन्सचा खर्च जास्त होता. त्यामुळे तिने 200 चौरस फुटांच्या छोट्या तंबूत राहण्याचा निर्णय घेतला. आता तिचे हे घर झोपडीवजा टेंट हाऊससारखे आहे; पण पैसे वाचवता येत असल्याने ती यात बरीच खूश आहे.

कारी म्हणते की, छोटी जागा असल्याने घर सेट करणे सोपे होते आणि साफसफाईचा तापही राहात नाही. शिवाय, भरमसाठ वीज बिलापासून देखील सुटका होते. या छोट्या घरात आल्यापासून तिचे लाखो रुपये वाचत आहेत. भले हात-पाय हलवता नाही आले तरी चालेल; पण पैसे वाचवायला हवेत, यावरच तिचा सारा भर आहे. काटकसर हा परवलीचा मंत्र असला तरी निदान हात-पाय हलवण्यापुरती तरी जागा असावी, याचा मात्र तिला जणू सोयीस्कर विसर पडला आहे!

Back to top button