संगमनेरातील गावांची तहान 8 टँकरवर | पुढारी

संगमनेरातील गावांची तहान 8 टँकरवर

संगमनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : जून महिना संपत आला तरी पावसाची कुठलीच चिन्ह दिसत नाही. पाण्याची पातळी खालावल्याने पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी वाढली आहे. सध्या तालुक्यात 10 गावे व 34 वाड्या वस्त्यांना 8 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. मागिल वर्षी समाधानकारक पाऊस होऊन यंदाही अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पाणीसाठा टिकुन आहे.

अनेक गावात विहीरींना पाणी आहे, मात्र तालुक्यात काही गावात यंदाही पाणी टंचाई जाणवू लागली आहे. चालू हंगामात पाऊस चांगला व वेळेवर होईल अशी शक्याता वर्तविण्यात आली आहे. मात्र जून महिना संपत आला असून पावसाने पाठ फिरवली आहे. यामुळे चिंतेत वाढ झाली आहे. यामुळे संगमनेर तालुक्यातील अनेक गावात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी वाढू लागली आहे.

तालुक्यातील डोळासणे , कर्जुलेपठार, गुंजाळवाडी पठार, पोखरी बाळेश्वर , पिंपळगावदेपा , वरंवडी, खांबे , खांजापूर, चौधरवाडी व दरेवाडी अशा 10 गावांना व गावांर्गत येणार्‍या 34 वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. यासाठी खाजगी 8 टँकर सुरू आहे. या टँकरने 18 खेपा होतात. 10 गावातील 19 हजार, 692 नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. जर पावसाने पाठ फिरविल्यास परिस्थिती अशीच राहील्यास टँकरच्या संख्येत वाढ होवू शकते.

उन्हाची तिव्रता वाढत असून शेतीसाठी पाणी अवश्यक असल्याने आता भंडारदरा धरणातून शेतीसाठी आर्वतन सोडणे गरजेचे आहे. नदिकाठचा भाग वगळता इतर ठिकाणी पाण्या अभावी स्थिती अवघड झाली आहे. भंडारदरा व निळवंडे धरणात पाणीसाठा समाधानकारक असला तरी कालव्यांना पाणी सोडण्याची चाचणी घेण्यात आली. आर्वतन सोडले जात नाही. गावागावात पिण्यासाठी पाणी महत्वाचे असल्याने सध्या टँकरवर भर दिला जात आहे.

शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत

शेतीच्या मशागतीची कामे पुर्ण झाली असून पेरणीसाठी पावसाची प्रतिक्षा आहे. पाण्या अभावी भाजीपाला पिकांना भाव चांगला मिळत असला तरी उन्हाचा चटका सहन होत नाही. उत्पन्नावर विपरीत परीणाम होत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

टँकरमध्ये वाढ करण्यांची मागणी

तालुक्यातील 10 गावे 32 वाड्यांवस्तांना 8 टॅकरने 18 खेपा करत पिण्याचे पाणी पुरवठा केले जाते. उन्हाची तीव्रता बघता टॅकरसह खेपामध्ये वाढ करण्यांंची मागणी जोर धरत आहे.

हेही वाचा

Nashik Crime : चार महिन्यांपूर्वी रंगला होता थरार, अखेर गोळीबार करणारा सराईत गजाआड

पाकिस्तान कर्जबाजारी

मणिपुरात स्फोट; दोघे ठार, चौघे गंभीर

Back to top button