पारनेर : सायकलवरून एका दिवसात गाठले पंढरपूर | पुढारी

पारनेर : सायकलवरून एका दिवसात गाठले पंढरपूर

पारनेर; पुढारी वृत्तसेवा : राळेगणसिद्धी येथील सायकलपटू एकनाथ भालेकर यांनी एका दिवसात सायकलवरून 230 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत पंढरपूर गाठले. पुणे येथील मावळ अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन, वर्ल्ड ऑन व्हील्स व पेडलवाली या संस्थांच्या वतीने या सायकलवारीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात भालेकर यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी सायकलवारी एका दिवसातच पूर्ण केल्याने त्यांचे कौतुक होत आहे. पिंपरी चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरातील गणेशाचे दर्शन घेऊन त्यांनी या यात्रेची सुरुवात केली.

भालेकर म्हणाले, ‘सायकल चालवा, प्रदूषणरहीत पर्यावरणासाठी सायकल ही काळाची गरज असून, तिचा वापर आपण वाढविला पाहिजे.तसेच पर्यावरण वाचवा’ असा संदेश देण्यासाठी सायकल वारीचे आयोजन केले होते. आषाढी एकादशीपूर्वीच पांडुरंगाचे दर्शन घडल्याने आनंद झाल्याचे भालेकर यांनी सांगितले.

दिवसभरात 17 तास सायकलिंग

सायकलमित्र असलेल्या भालेकर यांनी याआधी दोन दिवसांत 230 किलोमीटरचे अंतर पूर्ण करत राळेगणसिद्धी ते पंढरपूर सायकलवारी पूर्ण केली होती. त्यामुळे यंदा ही वारी एका दिवसात पूर्ण करण्याचे नियोजन त्यांनी केले होते. मागील अनुभवाच्या जोरावर त्यांनी शनिवारी (दि. 10) रोजी पहाटे 3 वाजता पुण्याहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. सायंकाळी 7 वाजता तब्बल 17 तासांचा प्रवास करत ही सायकलवारी पांडुरंगाच्या दरबारात पोहोचली.

हेही वाचा

कर्जत : आमदार पवारांना पराभव पचविता येत नाही; आ राम शिंदेंची टीका

अहमदनगर : झेडपीत सरपंचासह ग्रामस्थांचे उपोषणास्त्र

अहमदनगर : म्युझिकल फाउंटमधून पर्यटनाला चालना : आमदार संग्राम जगताप

Back to top button