अहमदनगर : म्युझिकल फाउंटमधून पर्यटनाला चालना : आमदार संग्राम जगताप | पुढारी

अहमदनगर : म्युझिकल फाउंटमधून पर्यटनाला चालना : आमदार संग्राम जगताप

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : साईनगर उद्यानाबरोबर सावेडी गंगा उद्यान येथे म्युझिकल फाउंटनचे काम लवकरच सुरू होईल. नगर जिल्ह्यात पहिल्यांदाच शहरात दोन म्युझिकल फाउंटन साकारत आहेत. म्युझिकल फाउंटन नक्कीच पर्यटकांसाठी आकर्षण ठरतील. त्यामुळे शहराचाही नावलौकिक वाढेल असा आशावाद आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला. पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी शहरात दोन म्युझिकल फाउंटन मंजूर असून त्यातील बुरुडगाव रोड साईनगर उद्यान येथे म्युझिकल फाउंटनचे काम सुरू आहे.

लवकरच ते नगरकरांसाठी खुले होणार आहे. या म्युझिकल फाउंटनच्या कामाची पाहणी आमदार जगताप यांनी केली.
उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त पंकज जावळे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, माजी नगरसेवक संजय चोपडा, शहर अभियंता मनोज पारखे, इंजिनिअर श्रीकांत निंबाळकर, राष्ट्रवादीचे अभिजित खोसे आदी उपस्थित होते.

यावेळी उपमहापौर गणेश भोसले म्हणाले, साईनगर उद्यानमध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून भव्य दिव्य स्वरूपात म्युझिकल फाउंटन साकारत असून याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ते लवकरच नगरकरांना पाहण्यासाठी खुले होईल. विद्युत रोषणाई, संगीत व गाण्यांच्या तालावर नाचणारा हा म्युझिकल फाउंटन पर्यटकांच्या मनपसंतीस उतरेल.

हेही वाचा

कर्जत : आमदार पवारांना पराभव पचविता येत नाही; आ राम शिंदेंची टीका

नाशिक : ९३ पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना दिले जाणार साधन सहाय; आजपासून होणार वितरण

Back to top button