कर्जत : आमदार पवारांना पराभव पचविता येत नाही; आ राम शिंदेंची टीका | पुढारी

कर्जत : आमदार पवारांना पराभव पचविता येत नाही; आ राम शिंदेंची टीका

कर्जत(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : कर्जत, जामखेड बाजार समिती निवडणूक, खर्डा येथील सरपंचपदाची निवडणूक, तसेच कर्जत, जामखेडमधील ग्रामपंचायत निवडणूका या सर्वांमध्ये राष्ट्रवादीला भाजपने धूळ चारली आहे. हा पराभव आमदार रोहित पवारांना पचवता येत नाही. यामुळे ते आता चिडचिड अन् त्रागा करू लागले आहेत. मात्र, ही तर सुरुवात आहे. 2024ला पहा धोबीपछाड देणार, असे प्रतिपादन आमदार प्रा. राम शिंदे यांनी केले.

बाजार समितीच्या सभापती काकासाहेब तापकीर आणि उपसभापती अभय पाटील यांनी आमदार शिंदे यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ अध्यक्षस्थानी होेते. नूतन सभापती काकासाहेब तापकीर, उपसभापती अभय पाटील, भाजप नेते प्रवीण घुले व अशोकराव खेडकर, तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, शिवसेना तालुका प्रमुख बापूसाहेब नेटके, संचालक मंगेश जगताप, नंदकुमार नवले, शांतीलाल कोपनर, सरपंच काकासाहेब धांडे, काकासाहेब ढेरे, शेखर खरमरे, सरपंच अनील खराडे, सरपंच विलास निकत, दादासाहेब सोनमाळी, पप्पू धोदाड, अल्लाउद्दीन काझी, स्वप्नील देसाई, प्रवीण फलके, अनिल गदादे आदी उपस्थित होते.

तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत दोन्हीकडे समसमान संचालक निवडून आले. यातही भाजपने चमत्कार घडवीत सभापती, उपसभापतीपद खेचून आणले. जे जनतेच्या मनात असते तेच ईश्वर चिठ्ठीत पण निघते, याचा प्रत्यय जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत आला असून, त्या पाठोपाठ येथेही भाजपचा झेंडा फडकला. मात्र, या विजयानंतर भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांच्या घरावर जाऊन करण्यात आलेला हल्ला हा योग्य नाही, याचा आम्ही निषेध करतो, असे ते म्हणाले.

प्रा. शिंदे म्हणाले, राज्यात सरकार आपले आहे, कर्जत बाजार समितीचा चेहरा मोहरा बदलून टाकणार आहोत. अंबादास पिसाळ म्हणाले, जिल्ह्यात सर्वात लहान म्हणून ओळख असणारी कर्जतची बाजार समिती भविष्यात निश्चितच सर्वात मोठी होईल. नवनियुक्त संचालकांना संस्थेच्या हिताचे निर्णय घेण्यात यावे. परंतु, बिनकामाच्या व्यक्तींना अधिकार दिले की, ती संस्था रसातळास गेल्या शिवाय रहात नाही, असे ते म्हणाले. बापूसाहेब नेटके यांनी प्रास्ताविक केले.

हेही वाचा

श्रीरामपूर : सरपंच साळवींचा गावकरी मंडळाला राम-राम

नाशिक : ९३ पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना दिले जाणार साधन सहाय; आजपासून होणार वितरण

श्रीरामपूर : व्यापार्‍यास लुटणारे दोघे केले गजाआड

Back to top button