लोणी : भंडारदरातून आवर्तन सुटले : मंत्री विखे पा. | पुढारी

लोणी : भंडारदरातून आवर्तन सुटले : मंत्री विखे पा.

लोणी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : लांबलेला पाऊस आणि उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेवून भंडारादारा धरणातून शेतीसह पिण्याच्या पाण्याचे आवर्तन रविवारी संध्याकाळ पासूनच सोडण्याच्या सूचना महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी दिल्या.
भंडादारा धरणात पाण्याची उपलब्धता आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाप्रमाणे आवर्तन सोडण्याचे नियोजन करण्यास त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांना सांगितले.

यावर्षी पाऊस लांबल्याने लाभक्षेत्रातील काही गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. शेतातील पिकांसाठी पाण्याची तीव्रता भेडसावू लागल्याने शेतकर्‍यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी मंत्री विखे पा. यांनी अधिकार्‍यांसमवेत चर्चा केली. या आवर्तनाचा मोठा दिलासा शेतकर्‍यांसह नागरीकांना मिळणार आहे. प्रवरेच्या लाभक्षेत्रात या आवर्तनाचे नियोजन केले जाणार आहे. आवर्तनाच्या पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन मंत्री विखे यांनी केले आहे.

हेही वाचा

सोलापूर : निमगाव परिसरात बिबट्याची दशहत; बकऱ्यावर हल्ला, शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातारण

पुणे : आळेफाटा पोलिस ठाण्यात वकिलाचा दारू पिऊन धिंगाणा

आयपीएस अधिकारी रवी सिन्हा यांची RAW प्रमुख म्हणून नियुक्ती

Back to top button