सोलापूर : निमगाव परिसरात बिबट्याची दशहत; बकऱ्यावर हल्ला, शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातारण | पुढारी

सोलापूर : निमगाव परिसरात बिबट्याची दशहत; बकऱ्यावर हल्ला, शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातारण

निमगाव; पुढारी वृत्तसेवा : निमगाव मगराचे व मळोली (ता. माळशिरस) परिसरात रविवारी बिबटयाने बकऱ्यावर हल्ला कल्याची घटना घडली आहे. ६ जून रोजी या परिसरात बिबट्यासदृश्य प्राणी दिसल्याने वन विभागाकडून पिंजरा लावण्यात आला होता. रविवारी पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

किशोर बोडरे हा मेंढरे चारण्यासाठी रणवरे यांच्या शेतात गेला होता. त्यावेळी बिबटयाने बकऱ्यावर हल्ला केला. बोडरे याने मोठयाने ओरडाओरडा केला. त्याच्यासोबत कुत्री असल्याने त्यांच्या आवाजाने बिबट्या पळून गेला. या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, वनविभागाचे जिल्हा प्रमुख तसेच सबंधीत आधिकारी यांनी पिंजरे वाढविण्याच्या सुचना दिल्या असल्याचे आमदार राम सातपुते यांनी सांगितले.

मी शेतात मेंढरे चारण्यासाठी गेलो होतो. साधारणे तीन वाजता अचानक बिबट्याने बकऱ्यावर हल्ला केला. मी जोरात ओरडल्याने व सोबत कुञी असल्याने बिबटया ऊसाच्या शेतात पळून गेला.
– किशोर बोडरे

निमगाव मळोली शिवेवर ६५ फाटया लगत वन विभागाचे मोठे फॉरेस्ट असुन आजू-बाजूला ऊसाची शेती आहे. परिसर मोठा असल्याने वनविभागाकडून जास्त पिंजरे लावावेत व गस्त वाढवावी.
– विश्वनाथ मगर

हेही वाचा : 

Back to top button