आयपीएस अधिकारी रवी सिन्हा यांची RAW प्रमुख म्हणून नियुक्ती | पुढारी

आयपीएस अधिकारी रवी सिन्हा यांची RAW प्रमुख म्हणून नियुक्ती

पुढारी ऑनलाईन : देशाची गुप्तहेर संस्था रॉ (Research and Analysis Wing) चे प्रमुख म्हणून आयपीएस अधिकारी रवी सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने सोमवारी वरिष्ठ IPS अधिकारी रवी सिन्हा यांची RAW चे प्रमुख म्हणून दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी मान्यता दिली. रवी सिन्हा हे छत्तीसगड केडरचे १९९८ बॅचचे अधिकारी आहेत. सध्या ते कॅबिनेट सचिवालयाचे विशेष सचिव म्हणून काम पाहात आहेत. ते आता रॉ प्रमुख सामंत कुमार गोयल यांची जागा घेतील. गोयल यांचा कार्यकाळ ३० जून रोजी संपणार आहे.

सध्याचे रॉ प्रमुख सामंत गोयल यांच्या कार्यकाळात पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये एअरस्ट्राइक करण्यात आला. ही मोठी कारवाई मानली जाते. आताचे नवे रॉ प्रमुख रवी सिन्हा हे बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील आहे. रवी सिन्हा यांनी दिल्लीच्या सेंट स्टिफन्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आहे. १९८८ मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले होते.

हे ही वाचा :

 

Back to top button