

संगमनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : निळवंडे कालव्यांमधून चाचणीसाठी पाणी सुटले आणि दुष्काळी भागातील जनतेमध्ये आनंद निर्माण झाला. मात्र या कालव्याचे पाणी अकोले तालुक्यातील पाटाच्या कडेच्या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये तर काहींच्या घरांमध्ये पाणी गेले त्यामुळे निळवंडे धरणाचे पाणी बंद करण्यात आले, मात्र त्या भागातील शेतकऱ्यांच्या काही अडचणी असेल तर त्यांची समजूत काढत उपाययोजना करून हे पाणी सुरू ठेवता आले असते. मात्र असे काही ही न करता घाईघाईने कालव्यांचे पाणी अचानक बंद करणे हे चुकीचे आहे असा सवाल काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ.ण बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला आहे.
निळवंडे कालव्यांमधील पाणी बंद केल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करताना काँग्रेस नेते आमदार थोरात म्हणाले की, निळवंडे धरण व कालव्यांची कामे अनेक दिवसांच्या पाठपुराव्यातून व परिश्रमातून पूर्ण झाली आहे. ही कामे कोणी केली हे दुष्काळी भागातील सर्व नागरिकांसह जिल्ह्यातील व राज्यातील सर्व जनतेला माहित आहे. पंतप्रधानांच्या हस्तेच निळ वंडे कालव्यांचे उद्घाटन करायचे या हट्टा पायी निळवंडे डाव्या कालव्यात उशिराने पाणी सुटले, मात्र तेही पाणी मध्येच बंद करण्यात आले त्यामुळे दुष्काळी भाग तील शेतकऱ्यांमयध्ये नाराजी पसरली आहे.
भंडारदरा व निळवंडे दोन्ही धरणात 10 टीएमसी पाणी शिल्लक असताना चाचणीसाठी फक्त 2 टीएमसी पाणी सोडण्यात आले. अजून मोठ्या प्रमाणात धरणांमध्ये पाणी शिल्लक आहे. सोडलेले पाणी कालव्यांमधून सुरू ठेवले असते तरआजूबाजूंच्या विहिरींमध्ये पाणी उतरले असते. शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद वाढला असता. नागरिकांनी आनंद घेतलाअसता. मात्र हा आनंद कुणाला तरी पाहावत नसल्यामुळे अत्यंत घाईघाईने पाणी बंद करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचा आरोप आमदार थोरात यांनी केला.
अकोले तालुक्यातील नेतृत्व आणि शेतकऱ्यांच्या सहकार्यातूनच निळवंडेचे धरण आणि कालवे पूर्ण झाले. त्यांनीआज पर्यंत कायम सहकार्याची भावनाठेवलेली आहे. आजही त्यांच्याबरोबर चर्चा करून मार्ग काढता आला असता, मात्र असे काहीही न करता थेट पाणी बंद करणे हे दुष्काळी भागासाठी चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे आपल्याला दुष्काळी भागातील जनतेचा आनंद का पाहवत नाही, असा सवाल ही काँग्रेसचे नेते माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
हेही वाचा