अहमदनगर : निंबळकचा मुख्य चौक होणार ‘ग्रीन अँड क्लीन’ | पुढारी

अहमदनगर : निंबळकचा मुख्य चौक होणार ‘ग्रीन अँड क्लीन’

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : गेल्या कित्येक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या निंबळक येथील दत्त मंदिर चौकाचे सुशोभीकरण होणार आहे. त्यानंतर निंबळकचा मुख्य चौक ग्रीन अँड क्लीन बनणार आहे. चौकाच्या सुशोभीकरणासाठी35 लाखांचा निधी उपलब्ध झाल्याची माहिती सरपंच प्रियंका लामखडे यांनी दिली. दत्त मंदिर चौकाच्या सुशोभिकरणाचे निंबळककराचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. या कामाचा प्रारंभ करण्यात आला. दत्त मंदिर चौक परिसर हा गावातील मुख्य चौक आहे.

एमआयडीसी, मनमाड, पुणे, कल्याण महामार्गाला जाण्यासाठी या चौकातून जावे लागते. येथे चोवीस तास रहदारी तसेच वर्दळ असते. अतिक्रमणांमुळे या चौकाचा श्वास कोंडला होता. या चौकाचे विद्रूपीकरण झाले होते. अपघातही वाढले होते. चौकाच्या सुशोभीकरणासाठा सरपंच प्रियंका लामखडे यांनी आमदार नीलेश लंके यांच्याकडे मागणी केली असता, त्यांनी वीस लाख रुपयांचा निधी, तसेच ग्रामपंचायतीमधून पंधरा लाख रुपये असे असा 35 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला.

सुशोभीकरणाचा मास्टर फ्लॅन तयार करण्यात आला असून चौकात चोहूबाजूने नारळाची झाडे लावण्यात येणार आहेत. मध्यभागी गोल आकाराचे सर्कल केले जाणार आहे. तसेच आमदार लंके यांनी पंधरा लाख रूपायांचे 22 पथदिवे दिले आहेत. निमगाव रस्ता स्मशान भूमी रस्ता, तसेच रेल्वे स्टेशन भागामध्ये पथदिवे लावण्यात येणार आहे. या अगोदर ही निंबळक रेल्वे गेट ते दत्त मंदिर चौकापर्यत आ. लंके यांनी पथदिवे दिले आहेत. आता संपुर्ण गाव पथदिव्याच्या प्रकाशाने उजळणार आहे.

खंडोबा मंदिरात क तीर्थक्षेत्र वर्गातून पंधरा लाख रुपयाचे पेव्हींग ब्लॉक बसावीण्यात येणार असल्याची माहिती युवा उद्योजक अजय लामखडे यांनी दिली. यावेळी सरपंच प्रियंका लामखडे, माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार, अजय लामखडे, बाळासाहेब कोतकर, दत्तू दिवटे, सोमनाथ खांदवे, बाबासाहेब पगारे, किरण कळसे, राजू मगर, नितीन लवांडे, बबन कोतकर, चेतन काळेसह ग्रामस्थ उपस्थित होते.

आमदार लंकेंचे कौतुक

आमदार लंके यांनी निंबळकमध्ये विविध विकास कामांसाठी मोठा निधी दिला. त्यांनी दिलेल्या निधीतून निबळकमध्ये विविध विकास कामे झाली आहेत. आमदार लंके यांचे निंबळक ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

आमदार नीलेश लंके यांचे प्रत्येक गावात बारीक लक्ष असून, त्यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघाचा कायापालट झाला आहे. निमगाव गावासाठी त्यांनी भरपूर निधी दिल्याने विविध विकास कामे करता आली. सुशोभीकरणाने निंबळकच्या वैभवात भर पडेल.

प्रियंका लामखडे,
सरपंच, निंबळक

हेही वाचा

दहिगाव ने : वारं सुटलं, काळीज तुटलं; क्षणात स्वप्न भंगलं, केळी पिकासह फळबागा जमीनदोस्त

जामखेडकरांच्या डोळ्यांचे शिवसोहळ्याने पारणे फेडले

जळगाव : आता भाजपमध्ये जाणे शक्य नाही- एकनाथ खडसे

Back to top button