राहुरी : तनपुरे कारखाना कामगार आंदोलनाच्या पावित्र्यात | पुढारी

राहुरी : तनपुरे कारखाना कामगार आंदोलनाच्या पावित्र्यात

राहुरी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : तनपुरे साखर कारखान्याच्या कामगारांनी थकीत वेतनासह इतर मागण्यांसाठी येत्या आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. दरम्यान, खा. डॉ. सुजय विखे यांनी युनियनच्या पदाधिकार्‍यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करून, त्यांचा निषेध करण्यात आला. विविध मागण्यांसाठी आठ दिवसानंतर तीव्र जनआंदोलन व उपोषण करु, असा इशारा युनियनचे अध्यक्ष गजानन निमसे यांनी दिला.

राहुरी फॅक्टरी येथे डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांच्या बैठकीत राष्ट्रीय साखर कामगार युनियनचे अध्यक्ष निमसे बोलत होते. अध्यक्षस्थानी कामगार कृती समितीचे अध्यक्ष सुरेश थोरात होते. युनियनचे उपाध्यक्ष अर्जुन दुशिंग, सचिव सचिन काळे, कामगार नेते इंद्रभान पेरणे, कारभारी खुळे, बाळासाहेब तारडे, चंद्रकांत कराळे यांनी मागील सात वर्षांत खा. डॉ. विखे यांच्या कारभारावर हल्लाबोल केला.

खा. डॉ. विखे यांनी सात वर्षे कामगारांचे तोंडदेखले कौतुक केले. बँकेने कारखाना जप्त केला. प्रशासक मंडळ आले. निवडणूक लागली, तरी माझ्या काळातील कामगारांच्या वेतनाचा एक रुपया बुडवणार नाही, असा शब्द खा. डॉ. विखे यांनी वेळोवेळी दिला. त्यांच्या काळातील 17 महिन्यांचे वेतन, दोन वर्षांचे बोनस, दोन वेतन आयोगाच्या फरकांची रक्कम, रोजंदारीवरील कामगारांचे दोन पगार थकीत आहेत. कुटुंबाची उपासमार सुरू आहे.

हेही वाचा

लोणी : शासकीय कामांसाठी ‘क्रश सॅण्ड’चा वापर! महसूलमंत्री विखे पा.

मुंबई : आता कचऱ्याची तक्रार व्हॉट्सॲपवर करा !

पुणे : वारीमध्ये बोगस डॉक्टर असतील रडारवर !

Back to top button