नेवाशात 30 ब्रास वाळू जप्त, आठ चप्पू नष्ट

नेवाशात 30 ब्रास वाळू जप्त, आठ चप्पू नष्ट
Published on
Updated on

नेवासा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नेवासा महसूल विभागाने तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गौण खनिज विरोधात कारवाईची मोहीम सुरू केल्याने अवैध गौण खनिज वाहतूक धारकांचे धाबे दणाणले आहेत. या मोहिमेत 30 ब्रास वाळू जप्त केली, तर आठ चप्पू नष्ट करण्यात आले. प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या आदेशानुसार तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांच्यासह महसूल विभागाकडून बेकायदा वाळू वाहतूक विरोधात कारवाई करण्यात आली.

दोन दिवसांपूर्वी नेवाशात ज्ञानेश्वर मंदिरामागील प्रवरानदीच्या परिसरातील खंडोबा मंदिर, माळीची थडी, नागमोडी चिमणी, बिरोबा मंदिर परिसरातून लोकांनी साठवण केलेली सुमारे 30 ब्रास वाळू जप्त केली. तसेच, नदीपात्रामधील पाण्यातून वाळू काढणार्‍या आठ चप्पू जेसीबीच्या सहाय्याने पाण्यातून काढून जाळून नष्ट करण्यात आले. या कारवाईमुळे वाळू तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.

तहसीलदार संजय बिरादार, नेवासा मंडळाधिकारी अनिल गव्हाणे, नेवासा बुद्रुक मंडळाधिकारी बाबासाहेब माने, तलाठी आण्णासाहेब दिघे, नेवासा बुद्रुक तलाठी प्रदीप चव्हाण, रस्तापूर तलाठी घन:शाम नांगरे, खुपटी तलाठी गणेश घुमरे, कोतवाल बाळासाहेब चौधरी यांनी ही कारवाई केली.

नागरिकांना सहकार्याचे आवाहन

वरिष्ठांच्या आदेशानुसार अवैध गौण खनिज वाहतूक विरोधात महसूलची ही मोहिम सुरू राहणार असून, नागरिकांनाही याबाबत सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार संजय बिरादार यांनी केले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news