लाल किल्यावर पाकिस्तानी झेंड्याचे पोस्टर इन्स्टाग्रामवर व्हायरल करणाऱ्या नगरच्या युवकास अटक | पुढारी

लाल किल्यावर पाकिस्तानी झेंड्याचे पोस्टर इन्स्टाग्रामवर व्हायरल करणाऱ्या नगरच्या युवकास अटक

नगर : पुढारी वृत्तसेवा

लाल किल्ल्यावर पाकिस्तानचा झेंडा टाकून पोस्टर तयार करणाऱ्या आणि ते इन्स्टाग्रामवर व्हायरल करणाऱ्या नगरमधील युवकास कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे.

बेराेजगारांसाठी खूशखबर : पुढील दीड वर्षांमध्‍ये १० लाख जणांना नाेकरी मिळणार ! पंतप्रधान मोदींनी दिले भरतीचे आदेश

अहमदनगर शहरातील एका तरुणाने लाल किल्ल्यावर असेलला झेंडा हटवून त्या ठिकाणी पाकिस्तानचा झेंडा फडवकल्याचे पोस्टर इन्स्टाग्रामवर टाकल्याचे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.

मद्यप्राशन करून एसटी चालविली तर चालक-वाहक सरळ बडतर्फ, राज्य परिवहन महामंडळाचा निर्णय

पोलिसांनी या प्रकरणी तातडीने हालचाली करत आदनान नामक एका युवकास ताब्यात घेऊन कोतवाली पोलिस ठाण्यात आणले आहे. पुढील कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Back to top button