नगर : पावसाळ्यातही धावतात पाण्याचे 27 टँकर | पुढारी

नगर : पावसाळ्यातही धावतात पाण्याचे 27 टँकर

नगर : पुढारी वृत्तसेवा : गेल्या तेरा दिवसांत जिल्ह्यात सरासरी 29. 1 मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी सरासरी या कालावधीत 70 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाऊस कमी आहे. त्यामुळे पारनेर, नगर, संगमनेर व शेवगाव व अकोले या पाच तालुक्यांतील 46 गावे आणि 145 वाड्यावस्त्यांवर टंचाईग्रस्त गावांत अद्यापि टँकर सुरु आहेत. या टंचाईग्रस्त गावांतील भूजलपातळी वाढविण्यासाठी मुसळधार पावसाची आवश्यकता आहे.

बेराेजगारांसाठी खूशखबर : पुढील दीड वर्षांमध्‍ये १० लाख जणांना नाेकरी मिळणार ! पंतप्रधान मोदींनी दिले भरतीचे आदेश

गेले दोन वर्षे जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे उन्हाळयात टंचाईग्रस्त गावांची संख्या अत्यल्प होती. गेल्या वर्षी मेअखेरपर्यंत फक्त 22 टँकर सुरु होते. यंदाच्या वर्षी 27 टँकर पावसाळा सुरु झाला तरीही धावत आहेत.यंदा रोहिणी नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेले. 8 जूनपासून मृग नक्षत्र सुरु झाले. पहिल्याच दिवशी मृग नक्षत्राने नगर, पारनेर, जामखेड, श्रीगोंदा व संगमनेर या तालुक्यांत जोरदार हजेरी लावली. त्यानंतर शनिवारी नगर, जामखेड, शेवगाव, पाथर्डी या चार तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. नगर तालुक्यात आतापर्यंत 36.8 मि.मी., पारनेर तालुक्यात सरासरी 51.5, संगमनेर तालुक्यात 29.5 मि.मी. अकोले तालुक्यात 31.6, शेवगाव तालुक्यात 21.3 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

मद्यप्राशन करून एसटी चालविली तर चालक-वाहक सरळ बडतर्फ, राज्य परिवहन महामंडळाचा निर्णय

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या तालुक्यांत अत्यल्प पाऊस झाला आहे. या पावसामुळे भूजलपातळीत कोणताच फरक पडलेला नाही. त्यामुळे संगमनेर तालुक्यात 20 गावे व 48 वाड्या, अकोले तालुक्यातील 2 गावे व 15 वाड्या, नगर तालुक्यातील 6 गावे व 18 वाड्या,पारनेर तालुक्यातील 17 गावे व 63 वाड्या, शेवगाव तालुक्यातील 1 गाव 1 वाडीमध्ये अद्यापि पाणीटंचाईच्या झळा सुरु आहेत. त्यामुळे 46 गावे आणि 146 वाड्यांतील तहानलेल्या नागरिकांसाठी 27 टँकर धावत आहेत. यामध्ये संगमनेर 12, अकोले 3, नगर 5, पारनेर 6,शेवगाव तालुक्यातील एका टँकरचा समावेश आहे. पाणीटंचाई दूर होण्यासाठी भूजलपातळी वाढण्याची आवश्यकता आहे. यासाठी या तालुक्यांत मुसळधार पावसाची गरज आहे.

मविआ-भाजपमध्ये सामना, विधान परिषदेचीही लढत चुरशीची; १० जागांसाठी ११ उमेदवार

26 मंडलांत पावसाची प्रतीक्षा

सोमवारी सकाळपर्यंत कापूरवाडी, नागापूर, सावेडी,कर्जत, राशीन, भांबोरा, कोंभळी, मिरजगाव, माही, धांदरफळ, तळेगाव, घारगाव, डोळासणे, पिंपरणे, अकोले, वीरगाव, साकीरवाडी, कोतूळ, ब्राम्णवाडा, रवंदे, श्रीरामपूर, बेलापूर,उंदीरगाव, टाकळीभान, लोणी व बाभळेश्वर या 26 महसूल मंडलांत अद्यापि पावसाच्या सरी कोसळल्या नाहीत.

तालुकानिहाय झालेला पाऊस(मि.मी.)

नगर 36.8, पारनेर 51.5, श्रीगोंदा 35, कर्जत 11.4, जामखेड 41.8, शेवगाव 21.3, पाथर्डी 39.7, नेवासा 17.6, राहुरी 28.6, संगमनेर 26.5, अकोले 31.6, कोपरगाव 22.2, श्रीरामपूर 6.4, राहाता 13.4

Back to top button