‘त्या’ ठेकेदारांकडून खर्च वसूल करणार; महापालिकेने संबंधितांना धाडल्या नोटिसा | पुढारी

‘त्या’ ठेकेदारांकडून खर्च वसूल करणार; महापालिकेने संबंधितांना धाडल्या नोटिसा

नगर, पुढारी वृत्तसेवा: महापालिकेने अमृत अभियानांतर्गत हरित पट्टे विकसित करण्यासाठी शहरात 32 ठिकाणी ओपन स्पेसवर नवीन उद्याने निर्माण करून देखभाल दुरूस्ती ठेकेदारांकडे दिली होती. ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याने त्या उद्यानातील झाडे जळून गेली. मनपाने सांगून संबंधित ठेकेदाराने देखभाल केली नाही. अखेर मनपाने त्या तीन उद्यानात देखभाल दुरूस्ती केली असून, त्याचा खर्च आता संबंधित ठेकेदाराकडून वसूल करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या उद्यान विभागाकडे मोठ्या प्रमाणात उद्याने आहेत. मात्र, त्याची देखभाल दुरूस्तीसाठी अवघे 30 कर्मचारी कार्यरत आहेत. उपनगरामध्ये होणार्‍या नवीन वसाहतीमध्ये उद्यान उभे करण्यासाठी मनपाकडे कर्मचारी वर्गच नाही अशी अवस्था आहे. नव्याने उपनगरामध्ये अमृत योजनेंतर्गत उद्यान विकसित करण्यासाठी महापालिकेने चार वर्षांपूर्वी निर्णय घेतला होता.

महिलेचा मोबाईल लांबविणारे जेरबंद; पारनेर येथील घटना

अमृत अभियानांतर्गत बांधकाम विभागाच्या माध्यमातून ओपन स्पेसवर शहरातील 32 ठिकाणी ठेकेदारांच्या माध्यमातून उद्याने उभारली. कोरोना काळात त्या उद्यानाकडे ठेकेदारांनी दुर्लक्ष केल्याने मोठ्या प्रमाणात झाडे जळाली. मनपाने नोटिसा बजाविल्यानंतर सुमारे 28 ते 30 उद्यानात ठेकेदारांनी देखभाल दुरूस्ती केली. झाडांना आळे करणे, मोटार दुरूस्ती करणे आदी कामे केली.

मात्र, तीन उद्यानांमध्ये ठेकेदाराने काणतेच काम केले नाही. तिथे मनपाने मोटार दुरूस्ती, झाडांना आळे करणे आदी कामे केली. संबंधित ठेकेदाराला मनपाने नोटिस बाजवली असून, मनपाने केलेला खर्च त्या ठेकेदाराकडून वसूल करण्यात येणार आहे. त्याबाबत आयुक्तांनी ठेकेदारांना नोटीस बजाविली आहे.

‘अमृत’ची उद्याने अशी…

आगरकर मळा, आहेर कॉलनी, बोल्हेगाव, नंदनवन कॉलनी, रेणुकानगर, रेणावीकर कॉलनी, श्रीनाथ कॉलनी, कर्डिले निवास, मधुबन कॉलनी, तीर्थकर कॉलनी, फुलेनगर, कानडे मळा, मातोश्री उद्यान, आयोध्यानगर, भूषणनगर, ताराबाग कॉलनी, साईनगर, चैतन्यनगर, प्रेमभारतीनगर, भाग्योदय कॉलनी, आसरा सोसायटी, आदर्शनगर, आष्ठविनायक कॉलनी आदींसह नवीन सात उद्यानाचा त्यात समावेश आहे.

पडाया लागली शाळा..कसं बसशील बाळा; तोफखान्यातील इमारतीचा खचला पाया, भिंतीला गेले तडे

अमृत अभियानातील 32 उद्याने विकसित करण्यासाठी दिलेली आहे. त्यातील तीन उद्यानामध्ये झाडे लावल्यानंतर ठेकेदाराने देखभाल दुरूस्ती केली नाही. तिथे मनपाने देखभाल दुरूस्ती केली. आता त्याचा खर्च संबंधित ठेकेदाराकडून वसूल करण्यात येणार आहे.

सुरेश इथापे, शहर अभियंता, महापालिका

हेही वाचा 

सातारा : खुल्या प्रभागावर टपून बसलाय ‘थवा’

नाम गुम जायेगा?

रत्नागिरी : बारसू रिफायनरीसाठी स्थानिक अनुकूल

Back to top button