पंतप्रधान मोदींच्या योजना घरोघर पोहचवा : आ. राधाकृष्ण विखे पाटील  | पुढारी

पंतप्रधान मोदींच्या योजना घरोघर पोहचवा : आ. राधाकृष्ण विखे पाटील 

लोणी : पुढारी वृत्तसेवा

केंद्र सरकारच्या 78 योजनांचा लाभ समाजातील विविध घटकांना मिळाला आहे. प्रत्येक लाभार्थ्यांशी संवाद साधून ‘मन की बात करा’, पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे ही योजना आपल्यापर्यंत आल्याचे घरोघरी जावून सांगा. या सरकारच्या मर्मावर बोट ठेवून तीन पक्षांनी केलेली फसवणूक जनतेला पटवून द्या, या असे आवाहन आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप- पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले.

भारतीय जनता पार्टीच्या उत्तर नगर जिल्हा कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत आ. विखे यांनी सेवा सुशासन आणि गरीब कल्याण पर्वाच्या पार्श्वभुमीवर उत्तर नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये आयोजित करण्यात येणार्‍या कार्यक्रमाचा आढावा घेतला.

8 लाख रुपये खर्च, तरीही नगरकरांना मिळेना पुरेसे पाणी: 40 किलोमीटरहून येते पाणी

या बैठकीस माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के, माजी आ. वैभव पिचड, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. रघुनाथ बोठे, नितीन कापसे, सरचिटणीस जालिंदर वाकचौरे, सुनिल वाणी, नंदकुमार जेजूरकर, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे, किसान आघाडीचे सतिष कानवडे, अल्पसंख्याक आघाडीचे आसिफ पठाण, भटके विमुक्त आघाडीचे विठ्ठल राऊत, ओबीसी आघाडीचे बाळासाहेब गाडेकर, वैद्यकीय आघाडीचे डॉ. महेंद्र कोल्हे, व्यापारी आघाडीचे शिरीष मुळे यांच्यासह सर्व तालुका आणि शहर अध्यक्ष याप्रसंगी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी यांच्याकडून रे नगर गृहप्रकल्पाचा 22 जूनला आढावा

आ. विखे म्हणाले की, सेवा सुशासन आणि गरीब कल्याणपर्व हा पंधरा दिवसांचा कार्यक्रम खर्‍या अर्थाने केंद्र सरकारच्या योजनांचा जागर करण्याचा कार्यकाळ आहे. पंतप्रधान मोदींनी समाजातील सर्वच घटकांना डोळ्यासमोर ठेवून योजनांची केवळ घोषणाच केली नाही तर, प्रभावी अंमलबजावणी केली. समाजातील प्रत्येक माणूस हा कोणत्या ना कोणत्या योजनेचा लाभार्थी ठरला आहे.

मुदतवाढ मिळाली; मात्र दंडाचा भुर्दंड

या लाभार्थ्यांशीच आता तुम्हाला संवाद करायचा आहे. दर महिन्याला पंतप्रधान मोदी आपल्याशी मन की बात करतात, अशाच प्रकारची मन की बात आता लाभार्थ्यांशी जावून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना करायची असल्याचे त्यांनी सुचित केले. माजी आ.वैभव पिचड म्हणाले की, कोणत्याही गरीब माणसाला मिळालेल्या योजनेचा लाभ तो आयुष्यभर लक्षात ठेवतो. हीच आठवण आता भाजपच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना करुन द्यायची आहे.

केंद्र सरकार आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून कार्यकर्त्यांनी काम करावे, असे आवाहन करुन, आघाडी सरकारमुळे आदिवासी, दूध उत्पादक शेतकरी यांची घोर फसवणूक झाली आहे. स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य मिळू नये म्हणून प्रयत्न सुरु झाले आहेत. वाहतुकदारांचा पगार केला नसल्यामुळे धान्य मिळण्यात अडचण निर्माण होत असल्याची बाब त्यांनी बैठकीत उपस्थित केली.

केंद्र सरकारमुळे शेतकर्‍यांना मोठा आधार

केंद्र सरकारमुळे आज कृषि उत्पादीत मालाला मोठ्या प्रमाणात भाव मिळू लागला आहे. आज कापूस 14 हजार रुपये क्विंटलने तर सोयाबीन 12 हजार रुपये क्विंटलने विकले जात आहे. प्रथमच एवढा भाव कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना मिळाला. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे मोदींचे उद्दिष्ठ हे या माध्यमातूनच सिध्द होत असल्याचे सांगून केंद्र सरकारमुळेच या देशातील शेतकर्‍याला मोठा आधार मिळाला, असल्याचे आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

 

Back to top button