चांगला कोर्स-कॉलेजची निवड ही यशस्वी होण्याची गुरुकिल्ली : प्रा. राजेंद्र जाधव

चांगला कोर्स-कॉलेजची निवड ही यशस्वी होण्याची गुरुकिल्ली : प्रा. राजेंद्र जाधव
Published on
Updated on

सातारा : पुढारी वृत्तसेवा

आज करिअर संदर्भातील क्षेत्रात विविध पर्याय निर्माण झाले आहेत. आता स्पर्धेच्या काळात एकच पदवी व कॉलेज, खासगी क्लासेसवरदेखील अवलंबून राहून चालणार नाही. नवनिर्मितीचा ध्यास, स्वतः शिकण्याची जिद्द याबरोबरच चांगला कोर्स, कॉलेज निवडणे ही जीवनात यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे, असे मत प्रा. राजेंद्र जाधव यांनी व्यक्त केले.

दै. 'पुढारी' आयोजित व संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत एज्युदिशा 2022 शैक्षणिक प्रदर्शनात करिअर विषयक मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जाधव म्हणाले, स्वतःमध्ये काही कमी आहे, हि मनात खंत ठेवू नये. आपल्या करिअरसाठी योग्य इन्स्टिट्यूट निवडणे गरजेचे आहे. करिअरसाठी विविध क्षेत्रात संधीची उपलब्धता असून करिअर करताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल झाले आहेत.

फार वेगळ्या विषयात करिअर करणार्‍या विद्यार्थ्यांनी बदलत्या इंडस्ट्रीचा विचार करणे गरजेचे आहे. करिअर निवडताना बेसावध राहून चालणार नाही. आपण घेतलेल्या कोर्सला पुढील 15 वर्षांत किती स्कोप आहे, याचा विचार विद्यार्थ्यांना करावा लागणार आहे. भारतात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना इतर देशातील वस्तुस्थिती काय आहे याची माहिती असणे गरजेचे आहे. मुळात भारतीय विद्यार्थी न समजलेल्या प्रश्नावर विचार करीत नाही.

मळलेल्या वाटेने जात मोठे होण्याचे स्वप्न पाहतात. याउलट परदेशातील मुले अगदी सोप्या पद्धतीने शिकतात, त्यांचे ध्येय मोठे ठेवतात व त्यामध्ये यशस्वी होतात. बदलत्या स्पर्धेच्या युगात शाळा, कॉलेजमधील ज्ञानावर अवलंबून राहता येणार नाही. त्यांना डोळसपणे सगळ्या गोष्टी स्वत: शिकाव्या लागणार आहेत. येणार्‍या काळात विद्यार्थ्यांना गुगल, डेटा अ‍ॅनालिटिक्स शिकावे लागणार आहे. इंग्रजीबरोबर परदेशी भाषा अवगत करून यशस्वी करिअर करावे लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news