५० हजारांच्या पैंजणावर मारला चोरटयांनी डल्ला | पुढारी

५० हजारांच्या पैंजणावर मारला चोरटयांनी डल्ला

नगर : पुढारी वृत्तसेवा

चांदीचे पैंजण खरेदी करण्याच्या बहाण्याने सोन्याच्या दुकानात आलेल्या चार महिलांच्या टोळीने 50 हजारांच्या 17 पैजणांवर हात साफ केला आहे. तपोवन रोडवरील जानकी ज्वेलर्समध्ये घटना घडली असून सीसीटीव्ही फूटेज मधून हा प्रकार उघडकीस आला आहे.

Aashram 3 : ‘आश्रम’ची अभिनेत्री म्हणाली, पप्पांना विचारूनच दिले इंटीमेट सीन!

देविदास भाऊसाहेब डहाळे (40,रा.सुर्यानगर,तपोवन रोड) यांच्या दुकानात हा प्रकार घडला. या प्रकरणी त्यांनी तोफखाना पोलिसांत फिर्याद दिली आहे. तपोवन रस्त्यावरील डहाळे यांच्या जानकी ज्वलर्समध्ये (दि.31) मे रोजी चार महिला तोंडाला स्कार्फ बांधून आल्या. चांदीचे पैंजण दाखविण्याचे त्यांनी दुकानदाराला सांगितले.

जगातील दोन हजार किडे खाण्यायोग्य!

पैंजण दाखविल्यानंतर दोन महिलांनी सोन्याचे गंठण दाखविण्याची मागणी केली. दरम्यान सोन्याचे गंठण दाखविण्यासाठी बाजूला होताच कडेवर लहान मुलगा असलेल्या एका महिलेने चांदीचे 17 पैंजण उचलून ते पदराआड लपवून ठेवले. चारही महिला काहीच खरेदी न करता दुकानातून निघून गेल्या.

ब्रेस्ट सर्जरीचा दिला होता सल्ला

त्यानंतर डळाळे यांना 17 चांदीचे पैंजण गायब असल्याचे लक्षात आले. सीसीटिव्ही कॅमेर्‍याचे फुटेज तपासल्यानंतर स्कार्फ बांधून आलेल्या महिलांनीच चोरी केल्याचा प्रकार समोर आला. तोफखाना पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास पोना आव्हाड हे करत आहेत.

Back to top button