Aashram 3 : ‘आश्रम’ची अभिनेत्री म्हणाली, पप्पांना विचारूनच दिले इंटीमेट सीन! | पुढारी

Aashram 3 : ‘आश्रम’ची अभिनेत्री म्हणाली, पप्पांना विचारूनच दिले इंटीमेट सीन!

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉबी देओलची यशस्वी वेब सिरीज 3 जून रोजी OTT प्लॅटफॉर्म MX Player वर रिलीज होणार आहे. रिलीज होण्याआधीच या वेब सिरीजमधील स्टारकास्टची जोरदार चर्चा आहे. अभिनेत्री अनुरिता झा आश्रम 3 मध्ये तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड स्टाईलने चाहत्यांना आश्चर्यचकित करणार आहे. (Aashram 3)

अनुरीताने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘आश्रम वेब सिरीजसाठी इंटिमेट सीन देण्यापूर्वी मी वडिलांना याबाबत कल्पना दिली होती. पहिल्यांदाच मी असा इंटिमेट सीन दिला. पहिल्यांदा मी माझ्या वडिलांना फोन केला आणि म्हणाले की, बाबा माझी भूमिका अशी असेल. मी ती साकार केली तर चालेल का? यावर माझ्या पप्पांनी होकार दिला. ते म्हणाले बिनधास्त कर. पप्पांनी परवानगी दिल्यानंतरच मी या भूमिकेसाठी होकार दिला.’ (Aashram 3)

माझ्या इंटीमेट सीनच्या चित्रीकरणावेळी सेटवर फक्त 4-5 लोक होते. मला हा सीन कसा करावे याबाबत माहित नव्हते. पण सीनपूर्वी मी दिग्दर्शक प्रकाश झा यांच्याशी चर्चा केली होती. त्यामुळे भीती नव्हती. मी ऑनस्क्रीन रडले असेल तर मला कसे रडायचे ते माहित आहे. पण इंटीमेट सीन कसे करायचे हे मला माहीत नव्हते, असेही अनुरिताने सांगितले. (Aashram 3)

प्रकाश झा यांनी मला काळजी करू नकोस, असा सल्ला दिला. सर्व काही व्यवस्थित होईल असा विश्वासही दिला. पण तरीही माझ्या मनात काही वेगळेच सुरू होते. तो बोल्ड सीन मला अश्लील दिसायला नको असे वाटत हिओते. याला कारण म्हणजे, मी बिहारची आहे. माझे कुटुंब साधे आहे. मला चंदेरी दुनियेची पार्श्वभूमी नाही. अशा अनेक गोष्टींचा मनात गोंधळ सुरू होता. (Aashram 3)

मुलाखतीत अनुरिता झाने बॉबी देओलसोबत काम करण्याचा अनुभवही शेअर केला. तिच्या मते, बॉबी देओल खूप गोड आणि मस्त आहे.

आश्रम मालिकेनंतर लोक अनुरिता झाला ओळखू लागले आहेत. या यशाचा ती खूप आनंद घेत आहे. अनुरिता 2012 मध्ये आलेल्या गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटात दिसली होती. विनीत कुमारच्या ऑनस्क्रीन पत्नीच्या भूमिकेत दिसली होती.

बॉबी देओलचा बरसात सिनेमा पाहिल्यानंतर मी त्याची फॅन झाली होती. तो माझा पहिला क्रश होता, असेही अनुरिताने व्यक्त केले.

आश्रम 3 एमएक्स प्लेअरवर 3 जून रोजी प्रदर्शित होत आहे. या या सिझनमध्ये ईशा गुप्ता, बॉबी देओलसह अनेक स्टार्स दिसणार आहेत. आश्रमचे पहिले दोन सीझन चांगलेच पसंतीस उतरले आहेत. तिस-या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. (Aashram 3)

Back to top button