जगातील दोन हजार किडे खाण्यायोग्य! | पुढारी

जगातील दोन हजार किडे खाण्यायोग्य!

लंडन : चीनसारख्या काही देशांमधील लोक आहारात किड्यांचाही वापर करतात व त्याबद्दल आपण त्यांची खिल्लीही उडवत असतो. मात्र, हल्ली पाश्चात्त्य देशांमध्येही किड्यांचा आहार हा कुपोषण, आहाराची कमतरता यावर उपाय म्हणून तसेच एक पौष्टिक आहार म्हणूनही चांगला असल्याचा सूर उमटत आहे.

आता इंग्लंडच्या कार्डिफ युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टच्या संशोधकांनीही असाच सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की मांस आणि त्यापासून बनवल्या जात असलेल्या उत्पादनांमुळे 64 दशलक्ष टन कार्बन डायऑक्साईड उत्पन्न होतो. त्याऐवजी विविध किड्यांचा आहारातील वापर अधिक उपयुक्त आहे. जगात दोन हजार किडे खाण्यास योग्य व प्रोटिनयुक्त असल्याचेही संशोधकांनी म्हटले आहे.

Back to top button