पुणे: महापालिकेचा मिळकतकर सवलत फक्त उद्यापर्यंतच; 1 जूनपासून 2 टक्के दंड होणार लागू | पुढारी

पुणे: महापालिकेचा मिळकतकर सवलत फक्त उद्यापर्यंतच; 1 जूनपासून 2 टक्के दंड होणार लागू

पुणे : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेचा मिळकतकर वेळेत भरणार्‍या करदात्यांना महापालिकेकडून 5 व 10 टक्क्यांची सवलत दिली जाते. ही सवलत मिळविण्यासाठी आता अखेरचे दोन दिवस उरले असून, मंगळवारी (दि. 31) ही सवलत संपुष्टात येणार आहे. त्यानंतर 2 टक्के दंड लागू होईल. महापालिका हद्दीतील नागरिकांना एप्रिलपासून मिळकतीच्या बिलांचे वाटप केले जाते. त्यानुसार दि. 31 मेपर्यंत कर भरणार्‍या नागरिकांना विशेष सवलत दिली जाते.

सातारा : ‘सिंचन’चे शेकडो पाणी परवाने अनधिकृत

त्यात प्रामुख्याने ज्या मिळकतकरधारकांची सर्वसाधारण कराची रक्कम 25 हजारांपेक्षा कमी आहे. अशा करदात्यांना 10 टक्के, तर 25 हजारांपेक्षा अधिक सर्वसाधारण कराची रक्कम असलेल्या करदात्यांना 5 टक्के सवलत दिली जाते. आता ही सवलत मेअखेरीस संपणार आहे. त्यामुळे जास्तीत नागरिकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मिळकतकर विभाग प्रमुख, उपायुक्त अजित देशमुख यांनी केले आहे.

रविवारी 7 कोटी 88 लाख कर वसूल

जास्तीत नागरिकांना या सवलतीचा लाभ घेता यावा, यासाठी महापालिकेने शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी महापालिकेची कर भरणा केंद्र सुरू ठेवली होती. त्यात रविवारी एकाच दिवशी 7 कोटी 88 लाख 76 हजार इतकी रक्कम झाली. गत वर्षी ह्याच दिवशी 29 कोटी 57 लाख इतका कर जमा झाला होता.

संपाचा फटका हॉस्पिटलला कमी, रुग्णांना अधिक

दोन महिन्यांत 791 कोटींचे उत्पन्न

मिळकतकरातून दि. 1 एप्रिल ते 29 मे या दोन महिन्यांच्या कालावधीत महापालिकेला तब्बल 791 कोटीं 94 लाखांचे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. याच कालावधीत गतवर्षी 632 कोटी 74 लाखांचे उत्पन्न मिळाले होते. गत वर्षीच्या तुलनेत 159 कोटी 20 लाख अधिक उत्पन्न मिळाले आहे.

Back to top button