प्रवेशद्वारावरूनच वाहतूक कोंडीतून पुणे दर्शन; शनिवारवाडा लगत पे अ‍ॅन्ड पार्कची गरज! | पुढारी

प्रवेशद्वारावरूनच वाहतूक कोंडीतून पुणे दर्शन; शनिवारवाडा लगत पे अ‍ॅन्ड पार्कची गरज!

कसबा पेठ : पुढारी वृत्तसेवा

उन्हाळी सुटी, त्यात रविवार असल्याने शनिवारवाडा पाहण्यासाठी पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे शनिवारवाड्यासमोरील पार्किंग फुल्ल होऊन बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, देसाई कॉलेज परिसर वाहनांनी गजबजला होता. सुटीच्या दिवशी शहरातील मध्यवर्ती भागातील शनिवारवाडा, लालमहाल, नाना वाडा, महात्मा फुले वाडा तसेच दगडूशेठ हलवाई गणपती, तुळशीबाग, लक्ष्मी रस्ता ही स्थळे पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी होते.

रविवारी झालेल्या गर्दीमुळे पर्यटकांना मिळेल तिथे वाहने लावावी लागली; या प्रवेशद्वारावरूनच पर्यटकांचे वाहतूक कोंडीतूनच पुणे-दर्शन होत आहे. ऐतिहासिक वास्तू, सांस्कृतिक खाणाखुणा असलेल्या शहरात दररोज हजारो पर्यटक भेट देत असतात. पण पर्यटकांसाठी आवश्यक पायांभूत सुविधादेखील उपलब्ध नसल्याने पर्यटकांमध्ये नाराजी पसरत आहे. शनिवारवाडा पर्यटकांसाठी वाहनतळ निःशुल्क आहे. इतर वाहनांसाठी प्रवेश मनाई आहे.

पुणे: रायवळ आंबा बाजारात; प्रतिकिलो शंभर ते दोनशे रुपये दराने विक्री 

शिवाजी रस्ता, बाजीराव रस्त्यावर वाहनांच्या रांगा

उन्हाळी सुटी असल्याने शनिवारवाड्याला रविवारी 7 हजारांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली. इतर शनिवार-रविवार गर्दी होती. मात्र आजची गर्दी सर्वांत जास्त होती, अशी माहिती प्रशासनाने दिली.

शनिवारवाडा लगत पे अ‍ॅन्ड पार्कची गरज आहे. तसेच गाड्या पार्क करायच्या कुठे, हेच कळत नाही आणि इथे कोणी गार्डसुद्धा नाही. दिशादर्शक फलक नाही. शौचालयासाठी रस्ता ओलांडून जावे लागते.

                                                         – रफिक मुल्ला, पर्यटक

हेही वाचा

पुतीन यांचा मृत्‍यू ?; खुर्चीवर त्‍यांचा बहुरूपी : ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेचा दावा

सांगली : अंडाबुर्जी विक्रेत्याचा भोसकून खून

अन्न सुरक्षेचे वाढते आव्हान

 

Back to top button