अर्थज्ञान : ‘सुंदरम् सर्व्हिसेस फंड’ ऑल टाईम विनर! | पुढारी

अर्थज्ञान : ‘सुंदरम् सर्व्हिसेस फंड’ ऑल टाईम विनर!

सन 1954 साली मद्रास येथे सुंदरम् फायनान्स या नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीची स्थापना दुचाकी वाहनांना कर्जे देण्याच्या उद्देशाने झाली. केवळ तीन लाख रुपयांच्या भागभांडवलाने सुरू झालेल्या या कंपनीचा आता प्रचंड मोठा वटवृक्ष झाला आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर नोंदणी झालेल्या या कंपनीच्या आज सहा उपकंपन्या आहेत आणि त्यापैकीच एक आहे सुंदरम् अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी लि. ही कंपनी 54,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेचे व्यवस्थापन पाहते. 35 लाखांहून अधिक लोक तिचे गुंतवणूकदार आहेत.
सर्व्हिसेस सेक्टरचे भारताच्या ॠऊझ शी प्रमाण जवळपास 55 टक्के आहे. या सेक्टरचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन सुंदरम्ने सप्टेंबर 2018 मध्ये ‘सुंदरम् सर्व्हिसेस फंड’ हा आपला अनोखा फंड बाजारात आणला. 30 एप्रिल 2022 अखेर या फंडाने 21.83 टक्के असा नेत्रदीपक परतावा दिलेला आहे. निफ्टी सर्व्हिसेस सेक्टर ढठख आणि निफ्टी 500 मल्टिकॅप 50:25:25 ढठख या आपल्या दोन्ही इंडायसेस या फंडाने सातत्याने मागे टाकले आहे. परताव्याचे खालील कोष्टक पाहा ः

या फंडाने एकूण सहा सर्व्हिस सेक्टर्स गुंतवणुकीसाठी निवडली. ती खालीलप्रमाणे आहेत.

1) फायनान्शिअल सर्व्हिसेस – रिटेल लेंडर्स, वेल्थ मॅनेजमेंट कंपनीज्, इन्शुरन्स कंपनीज्
2) हेल्थकेअर सर्व्हिसेस – हॉस्पिटल्स, डायग्नोस्टिक कंपनीज्
3) ट्रेड, टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी – रिटेल, हॉटेल्स अँड रेस्टॉरंटस्, टुरिझम कंपनीज्
4) ट्रान्स्पोर्टेशन – एव्हिएशन, लॉजिस्टिक्स
5) बिझनेस सर्व्हिसेस – बीपीएम, स्टाफिंग
6) अदर सर्व्हिसेस – मीडिया, एंटरटेन्मेंट अँड गेमिंग, टेलिकॉम, डाटा, प्रोव्हायडर्स, ऑनलाईन सर्व्हिसेस.
वरील सहा सेक्टर्समधील एकूण 47 कंपन्यांमध्ये फंडाची गुंतवणूक आहे. शिवाय चरज्ञश चू ढीळि ङींव. या अमेरिकन कंपनीमध्येही फंडाने गुंतवणूक केली आहे. भारतातील गुंतवणुकीपैकी 62 टक्के गुंतवणूक लार्ज कॅप कंपन्यामध्ये, तर 14 टक्के गुंतवणूक स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये आहे. गुंतवणूक केलेल्या कंपन्यांपैकी ढेि 5 कंपन्या आणि त्यामधील गुंतवणुकीचे एकूण प्रमाण खालीलप्रमाणे आहे.

ICICI Bank – 9.21%
HDFC Bank – 7.95%
Reliance – 6.57%
Bharti Airtel – 6.49%
HDFC – 4.73%

राहुल बैजल आणि रोहित सक्सारिया हे या फंडाचे फंड मॅनेजर आहेत. ज्या कंपन्यांमध्ये दीर्घकालीन वाढीला वाव आहे आणि ज्या कंपन्यांचे व्यवस्थापन उच्च आहे, प्रवर्तकांची गुणवत्ता चांगली आहे, अशाच कंपन्यांच्या शेअर्समध्ये त्यांनी गुंतवणूक केली आहे. शिवाय मागील तीन वर्षांच्या काळामध्ये ज्या नवीन कंपन्यांचे खझज आले, त्यामध्ये अपलहेी खर्पींशीीेीं म्हणून या फंडाने मोठी गुंतवणूक केली. त्यापैकी काही कंपन्यांनी फंडाला मोठा लाभ मिळवून दिला.

कोव्हिडच्या काळातील लॉकडाऊनमध्ये ट्रेड, टुरिझम, हॉस्पिटॅलिटी आणि ट्रान्स्पोर्टेशन कंपन्या बंद असल्या तरी इतर सेक्टर्समधील सर्व कंपन्यांचा प्रचंड फायदा झाला.
सुंदरम् म्युच्युअल फंडाचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांच्या बर्‍याच फंडांमध्ये किमान गुंतवणूक 100 रुपये आहे. त्यामुळे अगदी सर्वसामान्य गुंतवणूकदारांनाही त्यामध्ये गुंतवणूक करता येते.

सुंदरम् सर्व्हिसेस फंड हा एक थीमॅटिक फंड आहे. थीमॅटिक किंवा सेक्टरल फंड हे नेहमीच जोखमीचे असतात; परंतु सर्व्हिस सेक्टर हे सदाहरित क्षेत्र आहे. त्यामुळे तुम्हाला एका अश्रश्र ढळाश थळपपशी आणि भारताच्या ॠऊझ मध्ये नेहमीच महत्त्वाचे योगदान असणार्‍या सेक्टरमध्ये गुंतवणूक असणार्‍या फंडामध्ये सहभाग घ्यावयाचा असेल, तर हा फंड नक्कीच विचारार्ह आहे. शेवटी नेहमीचा ऊळीलश्ररळाशी : गुंतवणुकीचा कालावधी किमान पाच वर्षांचा ठेवा. आपली जोखीम क्षमता विचारात घ्या आणि तुमच्या नजीकच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घ्या.

-भरत साळोखे

Back to top button