पुणे ; पुढारी ऑनलाईन Porsche Car Accident पुण्यातील पोर्शे कार अपघातात दाेन जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याच्या घटणेत पोलिसांकडून एक खुलासा समोर आला आहे. या घटनेतील आरोपी अल्पवयीन मुलाने त्याच्या वेगवान पोर्शे कारने दोघांना उडवायच्या आधी एका पबमध्ये पार्टी केली होती. या अपघाताच्या आधी त्याने एका पबमध्ये तब्बल ४८,००० रूपये खर्च केले होते. पोलिसांनी दावा केला आहे की, त्या मुलाने अपघाताच्यावेळी दारू प्राशन केली होती. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी किशोरच्या वडिलांना अटक केली आहे. या शिवाय पोलिसांनी कोजी रेस्त्राच्या मालक प्रल्हाद भुटाडा आणि मॅनेजर सचिन काटकर आणि हॉटेल ब्लॅक चा मॅनेजर संदीप सांगले यांनाही अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका प्रसिद्ध बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने पबमध्ये जाऊन ९० मिनिटात ४८,००० रूपये खर्च केले. यानंतर रविवारी सकाळी त्याने त्याच्या पोर्शे टेकन कारने एका दुचाकीला धडक मारली. या अपघातात एक युवक आणि युवतीचा मृत्यू झाला. पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलाने ४८,००० रूपयांचे बिल कोजी या पबमध्ये भागवले आहे. किशोर आणि त्याच्या मित्र हे शनिवारी रात्री १० वाजून ४० मिनिटांनी या पबमध्ये आले होते. त्यावेळी त्यांचे ४८,००० इतके बील झाले.
कोजी रस्त्रांने त्यांना सेवा पुरवणे बंद केल्यानंतर १२ वाजून १० मिनिटांनी ते दुसरा पब ब्लॅक मेरियट मध्ये गेले. कुमारने सांगितले की, आम्हाला ४८,००० रूपयांचे बिल मिळाले आहे. ज्याचे पैसे अल्पवयीन मुलाच्या ड्रायव्हरने भरले होते. बिलामध्ये किशोर आणि त्याच्या मित्रांना देण्यात आलेल्या दारूचाही समावेश आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, किशोरने पबमध्ये जाऊन दारू घेतली होती. तरीही तो कार चालवत होता. आमच्याकडे अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या मित्रांचा दारू पितानाचे पुरेसे सिसिटीव्ही फुटेज आहेत. दरम्यान ब्लड सँम्पलचा रिपोर्ट अजुन आलेला नाही.
पुणे पोलिसांनी मंगळवारी (१७ वर्षीय) किशोर च्या विरूद्ध मोटर वाहन अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई आतापर्यंतची परिस्थिती आणि साक्षींच्या आधारे करण्यात आली आहे. पोलिस आयुक्तांनी शिवसेना खासदार संजय राउत यांनी विचारलेल्या प्रश्नाला देखील उत्तर दिले. ते म्हणाले या प्रकरणात कोणताही पक्षपात करण्यात आलेला नाही. यामध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव नाही. आम्ही सुरूवातीपासूनच कायदेशीररीत्या प्रक्रियेचा अवलंब केला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा :