Nashik Acid attack News | राग आला म्हणून त्याने तिच्यावर केला ॲसिडहल्ला, चुंचाळे येथील घटना | पुढारी

Nashik Acid attack News | राग आला म्हणून त्याने तिच्यावर केला ॲसिडहल्ला, चुंचाळे येथील घटना

सिडको, नाशिक : मागील भांडणाचा राग मनात धरून महिलेवर ॲसिड फेकून गंभीर दुखापत केल्याची घटना चुंचाळे परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगला सुनील ठोके (४५, रा घरकुल योजना, चुंचाळे अंबड) यांचे व संशयित आरोपी मधू पहेलवान यांचे काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. तो राग मनात धरून पहेलवानने सोमवारी (दि.२०) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ठोके यांच्यावर ॲसिडहल्ला केला. यात महिलेला दुखापत झाली असून, याप्रकरणी पहेलवानवर चुंचाळे पोलिस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा:

Back to top button