Mumbai Drugs Case : मोहीत कम्बोज हाच आर्यनच्या अपहरणाचा सूत्रधार | पुढारी

Mumbai Drugs Case : मोहीत कम्बोज हाच आर्यनच्या अपहरणाचा सूत्रधार

मुंबई : पुढारी ऑनलाईन

क्रूझ ड्रग्ज पार्टी आणि सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान या प्रकरणात (Mumbai Drugs Case) एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या आरोप-प्रत्यारोप आता वेगळ्या वळणावर पोहोचत आहेत.  समीर वानखेडे यांच्याबद्दल नवाब मलिक दररोज आरोप आणि गौप्यस्फोट करताना दिसत आहेत. मोहीत कम्बोज या हाॅटेल व्यवसायिकाचं आणि समीर वानखेडे यांच्यातील संबंध नवाब मलिक यांनी अधोरेखित करत आज पत्रकार परिषदेत अनेक गौप्यस्फोट केले आहेत.

नवाब मलिक म्‍हणाले की, “आर्यन खान ड्रग्ज प्रकरण (Mumbai Drugs Case) हे अपहरण आहे. त्याचा सूत्रधार हा मोहीत कब्मोज आहे. या अपहरणाच्या वसुली प्रकरणात कम्बोज हा समीर वानखेडेंचा साथीदार आहे. कम्बोज  शहरात १२ हाॅटेल चालवतो. ११०० बॅंक घोटाळ्याचा तो आरोपी आहे. आर्यन खान हा तिकीट काढून क्रूझवर पार्टीवर गेला नव्हता. त्याला नेण्यात आलं. त्यातूनच आर्यन खानला अडकवून खंडणी वसूल करण्याचं षडयंत्र आखण्यात आलं होतं”, असा गौप्यस्फोट नवाब मलिक यांनी केला .

“हाॅटेल व्यवसायिक मोहीत कम्बोज हे समीर वानखेडे यांना हाताशी धरून स्पर्धकांना धमकवतात. मनोज कम्बोजच्या भाच्याने आर्यन खानला क्रूझवर नेले होते. भाजपने दाखविलेल्या फोटोतील सुनील पाटील हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नाही. त्याचे भाजपच्या नेत्यांशी अनेक फोटो आहेत. विजय पगारे यांनी सुनील पाटीलसंदर्भात महत्वाची माहिती दिली. सुनील पाटलाने माझ्या संपर्क साधला, त्यावेळी मी त्यांना पोलिसांची संपर्क साधायला सांगितले”, अशी माहिती नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पहा फोटो : Sanskruti Balgude : हसता तू जरा खोल काळजात हुळहुळे…

Sanskruti Balgude : हसता तू जरा खोल काळजात हुळहुळे…

हेही वाचलं का?

 

Back to top button