दिवाळीच्या रात्री ‘सौर’ आतषबाजी! | पुढारी

दिवाळीच्या रात्री ‘सौर’ आतषबाजी!

न्यूयॉर्क :

देशभरात दिवाळीची आतषबाजी होत असताना अवकाशातही एक वेगळीच आतषबाजी होत होती. सूर्यावरून पृथ्वीच्या दिशेने झेपावलेल्या वादळाची ही आतषबाजी होती. या वादळामुळे दक्षिण आणि उत्तर ध—ुवाच्या भागात प्रकाशमान वातावरण झाले होते. पृथ्वीच्या चुंबकीय ध—ुवाला ज्यावेळी असे सौरवादळ धडकते त्यावेळी ‘ऑरोरा’ किंवा ‘नॉर्दन लाईट्स’ या नावाने ओळखला जाणारा रंगीबेरंगी प्रकाशझोतांचा खेळ आकाशात रंगतो.

काही आठवड्यांपूर्वीच एक सौरवादळ तयार झाले होते. या वादळाचा परिणाम दिवाळीच्या दिवशीच पृथ्वीवर दिसून आला. विशेषतः ध—ुवीय प्रदेशांमध्ये हा परिणाम दिसून आला. अर्थात या वादळाचा सर्वसामान्य लोकांच्या जीवनावर कोणताही थेट परिणाम होत नाही.
ज्या दिवसात किंवा ज्या काळात एखादे वादळ येते त्या वादळाला त्याचे नाव दिले जाते. 2000 साली आलेल्या वादळाला बास्टिले डे सॉर्म असे नाव देण्यात आले होते. 2003 मध्ये आलेल्या वादळाला ‘हॅलोविन डे स्टॉर्म’ असे नाव दिले होते. यावर्षी दिवाळीतच हे वादळ आल्याने त्याला दिवाळीशी संबंधित नाव मिळेल का याचे अनेकांना कुतुहल आहे!

Back to top button