कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या प्रमुख, प्रफुल्ल पटेल यांनी केलेली तटकरेंची नियुक्ती योग्य की अयोग्य? | पुढारी

कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या प्रमुख, प्रफुल्ल पटेल यांनी केलेली तटकरेंची नियुक्ती योग्य की अयोग्य?

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने पत्रकार परिषद घेत आमदार जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवलं आहे. प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारणीची घोषणा केली आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्षपदी खासदार सुनील तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासोबतच प्रफुल पटेल यांनी विधीमंडळाच्या गटनेतेपदी अजित पवार तर प्रतोदपदी अनिल पाटील यांची नियुक्ती केली आहे. एकीकडे शरद पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांना बडतर्फ केलं आहे. पवारांच्या ट्विटनंतर काहीच वेळात अजित पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये या कार्यकारणीची घोषणा करण्यात आली आहे.

यावेळी बोलताना पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून मी या नियुक्त्या करत असल्याचे खासदार प्रफुल पटेल यांनी जाहीर केलं. परंतु, पटेल यांना महाराष्ट्रासाठी नियुक्त्या करण्याचा अधिकार आहे? ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. या चर्चेला कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने दहा जून रोजी दिल्ली येथे झालेल्या पक्षाच्या वर्धापन दिनादिवशी दोन राष्ट्रीय कार्याध्यक्ष जाहीर केले होते. यावेळी प्रफुल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची नियुक्ती करण्यात आली. पटेल यांच्याकडे मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड आणि गोवा, तर सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्र, हरियाणा आणि पंजाब या राज्यांची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे एका कार्यकारी अध्यक्षाकडे महाराष्ट्राची जबाबदारी असताना दुसरा कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती करू शकतो? अशी जोरदार चर्चा आहे.

praful patel

Supriya sule

दरम्यान राष्ट्रवादीच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या गटाने केलेल्या नियुक्त्यांबाबत काही प्रश्न उपस्थित केले. तसेच “शरद पवार यांनी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना निलंबित केलं आहे. तुम्हाला अध्यक्षांनी कायदेशीरपणे निलंबित केलं आहे. त्यामुळे पटेल यांना नेमणुका करण्याचा अधिकार नाही”, असं देखील आव्हाड म्हणाले.

हेही वाचा:

सोलापूर : अजितदादांच्या शपथविधीनंतरही करमाळ्यातील राष्ट्रवादी समर्थकांकडून शुकशुकाट

जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनाच अपात्र करा; विधानसभा अध्यक्षांना दिले पत्र : अजित पवार

Praful Patel role in NCP split | अजित पवारांच्या बंडाचे सूत्रधार प्रफुल पटेल? २०१४ पासूनच भाजपला पोषक भूमिका?

 

Back to top button