कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भाला अतिवृष्टीचा इशारा, ३० जून पर्यंत देशात सर्वत्र जोरदार पाऊस | पुढारी

कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भाला अतिवृष्टीचा इशारा, ३० जून पर्यंत देशात सर्वत्र जोरदार पाऊस

पुणे, पुढारी वृत्तसेवा: आगामी चार दिवस संपूर्ण देशात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्यमहाराष्ट्रात २७ ते ३० जून तर विदर्भाला २७ रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान सोमवारी मान्सूनने गुजरात, राजस्थान व कश्मीर भागात प्रगती केली. आगामी ४८ तासांत मान्सून शंभर टक्के देश व्यापेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

बंगालचा उपसागर, अरबी समुद्र, महराष्ट्र ते केरळ किनरपट्टी या भागात चक्रीय स्थिती व कमी दाबाचे पट्टे तयार झाल्याने मान्सूनला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तो प्रचंड वेगाने पुढे जात आहे. सोमवारी तो गुजरात, राजस्थान व जम्मू कश्मिरच्या काही भागात पोहोचला. देशात या वातावरणामुळे सर्वत्र चांगला पाऊस सुरु झाला असून ४८ तासांत तो संपूर्ण देश व्यापणार आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अतिवृष्टी…

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा व अरबी समुद्रात वाऱ्यांची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने महाराष्ट्र, केरळ किनारपट्टीला आगामी पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग ताशी ५५ ते ७५ किमी इतका वाढत असल्याने कोकण व मध्य महाराष्ट्राला २७ ते ३० जून पर्यंत अतिवृष्टीचा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर विदर्भाला २७ रोजी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मराठवाड्याला २७ रोजी येलो अलर्ट (मुसळधार) पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

असे आहेत अलर्ट..

– कोकण:ऑरेंज अलर्ट : २७ ते ३० जून (७६ ते १०० मी.मी )

– मध्य महाराष्ट्र (घाट) : ऑरेंज अलर्ट : २७ ते ३० जून (५१ ते ७५मी.मी.)

– विदर्भ: ऑरेंज अलर्ट: २७ जून

– मराठवाडा: येलो अलर्ट २७ जून (२० ते ५० मी.मी)

हेही वाचा:

बारामती : धनगर समाजाच्या योजना प्रभावीपणे राबवू ; भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची ग्वाही

अजित पवारांच्या मागणीचा निर्णय पक्षातील प्रमुख लोक घेतील : शरद पवार

पुणे : शंभर एकरावरील टाऊनशीपला मुद्रांक शुल्कात 50 टक्के सवलत

 

Back to top button