Threatening To Ambani : मुकेश अंबानींच्या अँटिलियासह बच्चन, धर्मेंद्र यांचे बंगले बॉम्बने उडविण्याची धमकी | पुढारी

Threatening To Ambani : मुकेश अंबानींच्या अँटिलियासह बच्चन, धर्मेंद्र यांचे बंगले बॉम्बने उडविण्याची धमकी

नागपूर; पुढारी ऑनलाईन : एका अज्ञात व्यक्तीने मुंबईतील प्रसिद्ध लोकांचे घरांमध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी फोन करुन नागपूर पोलिसांना दिली. सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार भारतातील आघाडीचे उद्योजक मुकेश अंबानी यांचा अँटिलिया बंगल्यात स्फोट करण्याची धमकी अज्ञात व्यक्तीने नागपूर पोलीस कंट्रोलला फोन करुन दिली. तसेच बॉलिवूडचे महानायक अमिताब बच्चन आणि बॉलिवूडचे विंटेज अभिनेते धर्मेंद्र यांच्याही घरांवर बॉम्ब हल्ला करेन अशी धमकी दिली आहे. नागपूर पोलिसांनी या बाबत मुंबई पोलिसांना माहिती देत अलर्ट केले आहे. मुंबई पोलिस फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत. (Threatening To Ambani)

यापूर्वीही मिळाल्या आहेत अँटिलिया उडवण्याच्या धमक्या (Threatening To Ambani)

याआधीही मुकेश अंबानींचे घर अँटिलियाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. ऑगस्ट 2022 मध्येही मुकेश अंबानी यांच्या घरावर बॉम्बस्फोट करण्याचे कॉल आले होते.

अँटिलिया जवळ स्फोटकांनी भरलेले वाहन सापडल्याने उडाली होती खळबळ

याआधीही २५ फेब्रुवारी २०२१ रोजी अशाच प्रकारच्या धमकीने देशभरात खळबळ उडाली होती. प्रत्यक्षात दुपारी अँटिलियाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना एक संशयास्पद स्कॉर्पिओ कार दिसली. ज्याची माहिती तत्काळ मुंबई पोलिसांना देण्यात आली व तात्काळ तपास सुरु झाला होता. मुंबई श्वान पथक आणि बॉम्बशोधक पथकांनी या वाहनाचा तपास केला. दरम्यान या वाहनातून जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. तसेच या वाहनात मुकेश अंबानी यांच्या वाहनांशी मिळत्या जुळत्या नंबर प्लेट्स सापडल्या होत्या. या प्रकरणाची खूप चर्चा झाली व याचा दिर्घकाळ तपास चालू होता. पुढे याला राजकीय वळण सुद्धा लागले होते. या प्रकरणी मुंबई पोलिसातील एक पोलिस अधिकाऱ्यावर संशय घेतण्यात आला होता व अद्याप याबाबतची केस सुरु आहे. (Threatening To Ambani)

अँटिलियाच्या घटनेवर बनणार वेब सिरीज

या प्रकरणाचा तपास बराच काळ चालला आणि हे प्रकरण खूप गाजले. दोन वर्षांपूर्वी अँटिलियाच्या बाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारच्या मुद्द्यावर एक सनसनाटी आणि रोमांचक वेब सिरीज बनवली जाणार असल्याची बातमीही अलीकडेच आली होती. अनेक निर्मात्यांनी या कथेत रस दाखवला होता.

अधिक वाचा :

Back to top button