China Foreign Minister Qin Gang : चीनचे परराष्ट्र मंत्री किन गँग दिल्लीतील G-20 च्या बैठकीत सहभागी होणार | पुढारी

China Foreign Minister Qin Gang : चीनचे परराष्ट्र मंत्री किन गँग दिल्लीतील G-20 च्या बैठकीत सहभागी होणार

बीजिंग; पुढारी ऑनलाईन : चीनचे परराष्ट्र मंत्री किन गँग भारत दौऱ्यावर येणार आहेत. G-20 परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेत भाग घेण्यासाठी किन गँग भारतात येणार आहेत. चीनने मंगळवारी याला दुजोरा दिला आहे. चीनने सांगितले की, किन गँग २ मार्च रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या परिषदेत सहभागी होणार आहेत. (China Foreign Minister Qin Gang)

पत्रकार परिषदेत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग म्हणाले, “G-20 ने जागतिक अर्थव्यवस्थेतील प्रमुख आव्हानांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. G-20 परराष्ट्र मंत्रिस्तरीय बैठकीत सकारात्मक संदेश जाईल याची खात्री करण्यासाठी चीन सर्व पक्षांसोबत काम करण्यास तयार आहे.” (China Foreign Minister Qin Gang)

पंतप्रधान मोदी करणार मार्गदर्शन (China Foreign Minister Qin Gang)

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-20 सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांना मार्गदर्शन करू शकतात. यादरम्यान ते जागतिक स्तरावर भारताच्या वाढत्या प्रभावाबद्दल बोलतील. बंगळुरूमध्ये अर्थ प्रमुखांच्या बैठकीनंतर काही दिवसांनी परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होणार आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांचाही सहभाग

G-20 परिषदेत रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लॅवरोव, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन आणि ब्रिटनचे परराष्ट्र सचिव जेम्स क्लिव्हरली नवी दिल्ली येथील बैठकीत उपस्थित राहणार आहेत. भारताने G20 सदस्य नसलेल्या 40 देशांच्या प्रतिनिधींना आमंत्रित केले आहे.

टिकटॉक बंदीच्या निर्णयाला विरोध

दुसरीकडे व्हाईट हाऊसच्या टिकटॉकवर बंदी घालण्याच्या निर्णयाला चीनने विरोध केला आहे. अमेरिका राष्ट्रीय सुरक्षेच्या संकल्पनेचा अतिरेक करत आहे. विदेशी कंपन्यांना दडपण्यासाठी अधिकारांचा गैरवापर केला जात आहे, त्या चुकीच्या कृत्यांना आमचा तीव्र विरोध असल्याचे चीनने म्हटले आहे.

अधिक वाचा :

Back to top button