नगर : गोरक्षनाथगड देवस्थान रस्ता दि.29 मे पर्यंत बंद | पुढारी

नगर : गोरक्षनाथगड देवस्थान रस्ता दि.29 मे पर्यंत बंद

नगर : पुढारी वृत्तसेवा

नगर तालुक्यातील मांजरसुंभा येथील गोरक्षनाथ गडावर जाणारा घाट रस्ता दुरुस्तीसाठी दि. 29 मे पर्यंत बंद आहे. याकाळात पायी अथवा वाहनाने कोणालाही जाता येणार नाही. त्यामुळे भाविक व पर्यटकांनी गडाकडे येऊ नये, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. शंकरराव कदम व कार्यकारी मंडळाने केले आहे.

जमिनीचा मूळ मालक असल्याचे भासवत १ कोटी १५ लाखांची फसवणूक; बारामतीच्या लाकडी येथील घटना

सध्या सुट्ट्यांमुळे भाविक व पर्यटक रोज गर्दी करत आहेत. सुमारे अडीच किलोमीटर लांबीचा हा रस्ता पायथा ते मंदिरापर्यंत दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे डोंगरावरही कोणाला फिरायला जाता येणार नाही. कदाचित काम पूर्ण होण्यास जास्त दिवसही लागू शकतात, याची भाविकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे.

 मैत्रिणीच्या पतीनेच बलात्कार करून उकळली खंडणी; व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली धमकी

नवनाथ भक्तिसारमध्ये या ठिकाणाचे महत्त्व सांगितले आहे. स्त्री-राज्यातून परत येताना मच्छिंद्रनाथांनी मांजरसुंबा येथे ऋषी, मुनी, देवांसाठी भंडारा घालण्यासाठी सोन्याची वीट बरोबर आणली होती. ती गोरक्षनाथांनी फेकून दिली. तेव्हा मच्छिंद्रनाथाचा राग अनावर होऊन त्यांनी तांडव केले.

Bihar Politics : बिहारमध्ये राजकीय खळबळ, नितीश कुमारांचे फर्मान- आमदारांनी पुढील ७२ तास पाटणाबाहेर जाऊ नये

गुरूला शांत करण्यासाठी गोरक्षनाथांनी संपूर्ण डोंगरच सोन्याचा केला व गुरूंच्या इच्छापूर्तीसाठी सर्वाना निमंत्रण देऊन संपूर्ण श्रावण महिन्यात महायज्ञ करून अन्नदान केले, अशी पौराणिक कथा आहे. म्हणून लोक या ठिकाणी 12 महिने दर्शनाला येत असतात. मात्र, सध्या रस्त्याची दुरूस्ती करण्यात येत असल्यामुळे भाविकांनी गडाकडे येऊ नये, असे आवाहन देवस्थानने केले आहे.

Back to top button