Maratha reservation : मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीला सुरुवात | पुढारी

Maratha reservation : मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीला सुरुवात

पुणे, पुढारी वृत्तसेवा : १०२ घटना दुरुस्तीनंतर मराठा आरक्षण (Maratha reservation) लढा नक्की कसा असावा याविषयी तज्ञांशी चर्चा करण्यासाठी राज्यस्तरीय बैठकीला पुण्यात सुरवात झाली आहे.

या बैठकीला खासदार संभाजीराजे यांची प्रमुख उपस्थिती असून या बैठकीत राज्य समनव्यक राजेंद्र कोंढरे, राजेंद्र कुंजीर, धनंजय जाधव, सचिन आडेकर, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन फोलाने, रघुनाथ चित्रे पाटील, गणेश मापारी, हनुमंत मोटे, बाळासाहेब आमराळे, युवराज दिसले, प्राची दुधाने, सारिका जगताप, पूजा झोळे, अमर पवार यांसह पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, येथूनही राज्य समन्वयक उपस्थित आहेत.

प्रामुख्याने मराठा आरक्षण रद्द झाले नंतर महाराष्ट्र सरकारने छत्रपती संभाजीराजे यांना महिन्यात इतर मागण्या सोडवू असे सांगितले होते परंतु मागण्या सोडविल्या नाहीत तर आज दोन महिने होत आले. फक्त आश्वासनामुळे मराठा समाज नाराज असल्याने असंतोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पुढील आंदोलनाचा मार्ग या बैठकीत ठरणार आहे.

पुण्यातील बैठकीत आजवरचा पूर्ण लेखाजोखा उपस्थितांच्या हातामध्ये देण्यात येणार आहे. मागण्या व सध्या ची स्थिती युती सरकार व महाआघाडी यांनी राबवलेली व दिलेली आश्वासने पूर्ण व्हिडीओ तयार करून मांडली जाणार आहेत.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) महत्त्वाचे असणारे १०२ घटना दुरुस्ती विधेयक केंद्र सरकारमार्फत आज लोकसभेत येणार आहे.

पहा व्हिडीओ : महाराष्ट्राचे सर्वात मोठे ऑनलाईन शिक्षण प्रदर्शन आणि वेबिनार मालिका

Back to top button