रेल्वेच्या 25 गाड्या 17 दिवसांसाठी रद्द | पुढारी

रेल्वेच्या 25 गाड्या 17 दिवसांसाठी रद्द

पुणे : पुढारी वृत्तसेवा

दौंड स्थानकादरम्यान सुरू असलेल्या सबवेच्या कामामुळे 13 ते 29 मे या 17 दिवसांच्या कालावधीत 25 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे आता प्रचंड हाल होणार आहेत.

उत्तर कोरियात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर आणीबाणी जाहीर, संपूर्ण देश लॉकडाउन

या गाड्या रद्द

पंढरपूर-दादर एक्स्प्रेस, सोलापूर-पुणे डेमू, मुंबई- पंढरपूर एक्स्प्रेस, पुणे-दौंड डेमू, दौंड -बारामती डेमू, दौंड- पुणे डेमू, दौंड -पुणे शटल, बारामती- पुणे डेमू, पुणे -बारामती डेमू, सोलापूर- पुणे हुतात्मा एक्स्प्रेस, पुणे-सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस, पुणे -सोलापूर डेमू, पुणे- भूसावळ स्पेशल, बारामती-दौंड डेमू, भुसावळ- पुणे स्पेशल, दौंड -बारामती डेमू, पुणे -निझामाबाद डेमू, पुणे- दौंड डेमू, दौंड -पुणे दौंड, निझामाबाद -पुणे डेमू, बारामती- दौंड पॅसेंजर, निझामाबाद-पंढरपूर डेमू, पंढरपूर – निझामाबाद डेमू या गाड्या रद्द राहतील.

Destroyed Sneaker : फुकटात दिलं तरी काेणी घेणार नाही; पण बुटांची किंमत तब्बल दीड लाख!

या गाड्या निम्यापर्यंत धावतील

  • इंदोर दौंड एक्स्प्रेस -पुणे स्थानकापर्यंत
  • दौंड-ग्वाल्हेर एक्स्प्रेस-पुणे स्थानकापर्यंत
  • हैदराबाद-हडपसर एक्स्प्रेस -बार्शी टाऊन स्थानकापर्यंत
  • बंगळुरू मुंबई उद्यान एक्स्प्रेस- सोलापूर स्थानकापर्यंत
  • नांदेड पनवेल एक्स्प्रेस-कुर्डुवाडी स्थानकापर्यंत

औरंगाबाद : लेबर कॉलनी अखेर भुईसपाट, १२ तासांत ३०० घरे जमीनदोस्त

या गाड्या निर्धारीत वेळेत

  • दौंड इंदोर एक्स्प्रेस पुणे स्थानकाहून
  • ग्वाल्हेर-दौंड एक्स्प्रेस पुणे स्थानकाहून
  • हडपसर- हैदराबाद एक्स्प्रेस बार्शी टाऊन स्थानकाहून
  • मुंबई-बंगळुरू उद्यान एक्स्प्रेस सोलापूर स्थानकाहून
  • पनवेल नांदेड एक्स्प्रेस कुर्डुवाडी स्थानकाहून

Back to top button