पुणे विभागात एसटीची रोजची 14 लाखांची बचत | पुढारी

पुणे विभागात एसटीची रोजची 14 लाखांची बचत

प्रसाद जगताप

पुणे : एसटी डेपोबाहेरील पंपावर डिझेल टाकल्यामुळे एसटीची पुणे विभागात दररोज सुमारे 14 लाखांपर्यंत बचत होत असून, प्रतिलिटर 22 रुपये वाचत आहेत. त्यामुळे एसटी प्रशासनाला डिझेल खर्चात काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.

देशभरात कोरोना रुग्णसंख्या वाढ कायम; सक्रिय रुग्णसंख्या २० हजारांवर

पुणे विभागासह राज्यात एसटीला डेपोबाहेरील पंपावर प्रतिलिटर डिझेल 100 ते 103 रुपयांपर्यंत मिळत आहे, तर डेपोच्या आतमधील कंपन्यांच्या पंपावर एसटीला डिझेल 122 ते 130 रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे. परिणामी, डेपोमधील डिझेल पंप ओस पडले असून, डेपोबाहेरील खासगी पंपांवर एसटी गाड्यांच्या रांगा लागत आहेत. केंद्रशासनाने मोठ्या प्रमाणावर डिझेल टाकणार्‍या वाहन कंपन्यांकडून डिझेलचे अतिरिक्त शुल्क आकारण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार एसटीच्या डेपोमध्ये असलेल्या डिझेल डेपोंमधील पंपांवर अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे. यामुळे एसटी प्रशासन नाराज आहे.

Accident : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गॅस टॅंकर पलटी; ३ जणांचा मृत्यू

केंद्राच्या निर्णयानुसार बल्क कंझ्युमरचे डिझेल दर वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वच डेपोंमध्ये असलेल्या पंपांवर डिझेलचा दर कंपन्यांनी 130 रुपये प्रतिलिटर केला आहे, तर बाहेरील पंपावर एसटीला आता 100 ते 103 रुपये प्रतिलिटर डिझेल मिळते. त्यामुळे एसटीचे प्रतिलिटरमागे 22 रुपये वाचत असून, रोजची 13 ते 14 लाखांपर्यंत बचत होत आहे.

– ज्ञानेश्वर रणावरे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी, पुणे विभाग

मुंबईत २९ ठिकाणी एनआयएची छापेमारी; दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम फ्रूटला घेतलं ताब्यात

अशी होतेय बचत…

  • पुणे विभागाचा दैनंदिन डिझेल खर्च (डेपोबाहेरील पंप) : 70 लाख रुपये
  • पुणे विभागाचा दैनंदिन डिझेल खर्च (डेपोच्या आतील पंप) : 84 लाख रुपये
  • विभागाचे दैनंदिन किलोमीटर : 2 लाख 50 हजार
  • विभागाला लागणारे दैनंदिन डिझेल : 65 ते 70 हजार लीटर
  • डेपो बाहेरील पंपावर प्रतिलिटर डिझेल दर : 100 ते 103 रुपयांपर्यंत
  • डेपो आतील पंपावर प्रतिलिटर डिझेल दर : 122 ते 130 रुपयांपर्यंत
  • डेपोबाहेर डिझेल टाकल्यामुळे प्रतिलिटर होणारी बचत : 22 रुपये

Market : सेन्सेक्स घसरला, रुपया निचांकी पातळीवर, सोने आणखी महागले!

अशी आहे गाड्यांची स्थिती

  • पुणे विभागातील गाड्या : 840
  • विभागातील मार्गावरील बस : 640 (90 टक्के मार्गावर)
  • रोजच्या फेर्‍या : 2 हजार 100
  • रोजचे प्रवासी : 80 हजार
  • रोजचे उत्पन्न : 85 लाख

Back to top button