

पुढारी ऑनलाईन डेस्क :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे (Raj Thackeray) दौऱ्यासाठी मुंबईवरुन रवाना झाले आहेत. त्यांचे नवी मुंबईपर्यंत ठिकठिकाणी स्वागताची जंगी तयारी केली आहे. उद्या ते पुणे दौरा पुर्ण झाल्यानंतर ते औरंगाबाद दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. मुंबई ते औरंगाबाद त्यांची जय्यत तयारी केली आहे.
Raj Thackeray Pune Visit : उद्या औरंगाबाद दौऱ्यासाठी रवाना होणार
सांस्कृतिक मंडळावर 1 मे रोजी होणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेला अखेर गुरुवारी (दि. 28) पोलिसांनी परवानगी दिली. सामाजिक सलोख्याला बाधा निर्माण होईल, कोणत्याही समुदायाचा अनादर होणार नाही आणि 15 हजारांपेक्षा अधिक नागरिकांना निमंत्रण देऊ नका यासारख्या 16 अटी घालून ही परवानगी दिल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले. आज (दि. 29) ते पुणे दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी नवी मुंबईपर्यंत ठिकठिकाणी जंगी तयारी केली आहे. पुणे दौरा पुर्ण झाल्यानंतर ते उद्या औरंगाबाद दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत.
हेही वाचलंत का?