Rashid Khan Snake Shot : सापाने दिली राशिद खानला प्रेरणा!, ‘त्या’ फटक्याला दिले ‘स्नेक शॉट’ नाव | पुढारी

Rashid Khan Snake Shot : सापाने दिली राशिद खानला प्रेरणा!, ‘त्या’ फटक्याला दिले ‘स्नेक शॉट’ नाव

पुढारी ऑनलाईन डेस्क : फिरकीचा जादूगार राशिद खान (Rashid Khan Snake Shot) आयपीएल 2022 मध्ये त्याच्या गोलंदाजीपेक्षा त्याच्या फलंदाजीमुळे चर्चेत आहे. वानखेडे स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात गोलंदाजी महागात पडलेल्या राशिद खानने फलंदाजीने चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले.

हैदराबादच्या फलंदाजांनी गुजरातच्या रशिदची गोलंदाजी फोडली. राशिदने 4 षटकांत एकही विकेट न घेता 45 धावा दिल्या. हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्माने रशीदच्या षटकात खूप धावा लुटल्या. पण रशीदचा फलंदाजीतील अवतार पाहून हैदराबादचे गोलंदाजही चक्रावून गेले. रशीदने (Rashid Khan Snake Shot) शेवटच्या (20 व्या) षटकातील शेवटच्या चार चेंडूवर तीन षटकार ठोकून गुजरातने गमावलेला सामना जिंकून दिला.

सामन्यानंतर गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने राहुल तेवतिया आणि रशिद खानशी (Rashid Khan Snake Shot) संवाद साधला. यावेळी राशिदने मार्को जेन्सनविरुद्ध खेळलेल्या त्याच्या फटक्यांबद्दलचे गुपित सांगितले.

रशीदने ऑनसाइडवर काही विचित्र शॉट्स खेळले, ज्यामुळे सर्वजण थक्क झाले. त्याने या शॉट्सला ‘द स्नेक शॉट’ असे नाव दिले आणि त्याला बॅटचा पूर्ण स्विंग का आवडत नाही हे सांगितले.

रशीद म्हणाला, ‘मी याला स्नेक (साप) शॉट म्हणतो. जेव्हा साप एखाद्याचा चावा घेतो तेव्हा तो परत फना काढतो. जेव्हा गोलंदाज ‘फुल लेंथ’चा मारा करतो, तेव्हा मी शॉट पूर्ण करू शकत नाही. माझ्या शरीराची स्थिती मला शॉट्स खेळण्यास परवानगी देत ​​नाही. मी तसे करण्याचा प्रयत्न केला तर मी शक्ती निर्माण करू शकत नाही. म्हणून मी त्यावर खूप काम केले आहे आणि त्यासाठी माझे मनगट मजबूत केले आहे.’ (Rashid Khan Snake Shot)

गुजरातला शेवटच्या षटकात 22 धावांची गरज होती. राहुल तेवतियाने पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. यानंतर रशीदने तीन षटकार मारले, ज्यात त्याने शेवटच्या चेंडूवर षटकार मारून गुजरातच्या विजयाची नोंद केली. विजयानंतर तो म्हणाला, ‘खूप छान वाटत आहे. माझा माझ्या फलंदाजीवर आणि फिटनेसवर विश्वास होता की मी फटकेबाजी करू शकतो. मला आनंद आहे की मी सनरायझर्सविरुद्ध अशी कामगिरी केली आहे.’ (Rashid Khan)

‘गेल्या दोन वर्षांपासून मी माझ्या फलंदाजीवर काम करत आहे. सामन्याच्या शेवटच्या क्षणी मी चांगली फलंदाजी करू शकतो याचा मला स्वत:वर विश्वास होता. शेवटच्या षटकात अम्हाला 22 धावा करायच्या होत्या तेव्हा मी तेवतियाला सांगितले की आमचा सर्वोत्तम गोलंदाज फर्ग्युसनने शेवटच्या षटकात 25 धावा दिल्या, पण आता आपली वेळ आहे हैदराबादच्या गोलंदाजाकडून धावा वसूल करण्याची. जर चेंडू डॉट गेला तर घाबरू नकोस सामना संपवण्यावर लक्ष केंद्रीत कर.’ (Rashid Khan)

Back to top button