नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन
देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरुच आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३,३७७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात २,४९६ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या देशात १७,८०१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
देशात तब्बल दीड महिन्यांनी ३ हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. बुधवारी दिवसभरात ३ हजार ३०३ कोरोनाबाधित आढळले होते. तर, ३९ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान २ हजार ५६३ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. यापूर्वी १२ मार्चला रोजी ३ हजार ११६ कोरोनाबाधित आढळले होते. गुरूवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७४ टक्के नोंदवण्यात आला.
राजधानी दिल्लीत सर्वाधिक कोरोनाबाधित आढळून येत आहेत. बुधवारी दिवसभरात राज्यात १ हजार ३६७ कोरोनाबाधित आढळले होते. तर, एका रुग्णांचा मृत्यू झाला होता. दरम्यान १ हजार ४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. दिल्लीतील सक्रिय कोरोनाग्रस्तांची संख्या आता ४ हजारांवर पोहोचली आहे.
देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १८८ कोटी ६५ लाख ४६ हजार ८९४ डोस देण्यात आले आहेत. यातील २.७८ कोटी डोस १२ ते १४ वयोगटातील बालकांना देण्यात आले आहेत. तर, २ कोटी ७४ लाख ८८ हजार ४८४ बूस्टर डोस देण्यात आले आहेत.
केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १९३ कोटी ४ लाख २४ हजार २५ डोस पैकी १९ कोटी ५८ लाख २२ हजार ५७० डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशात आतापर्यंत ८३ कोटी ६४ लाख ७१ हजार ७४८ कोराना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ४ लाख ९७ हजार ६६९ तपासण्या बुधवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.